Soybean MSP  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean MSP : अमरावतीतील ८० शेतकऱ्यांच्याच सोयाबीनला मिळाला हमीदर

Soybean Market : ८६६४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली, तरी आतापर्यंत प्रत्यक्षात ८० शेतकऱ्यांकडूनच १७३१ क्विंटल सोयाबीनची हमीदराने खरेदी करण्यात आली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : हमीदराने सोयाबीन खरेदीसाठी ‘नाफेड’ने जिल्ह्यात वीस केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांवर ८६६४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली, तरी आतापर्यंत प्रत्यक्षात ८० शेतकऱ्यांकडूनच १७३१ क्विंटल सोयाबीनची हमीदराने खरेदी करण्यात आली आहे.

निवडणुकीत शेतकऱ्यांचा रोष ओढावू नये यासाठी राज्य सरकारने सप्टेंबरमध्ये हमीदराने सोयाबीन खरेदीचा निर्णय घेतला. १५ ऑक्टोबरपासून ‘नाफेड’च्या केंद्रांवरून राज्यात तेरा लाख टन सोयाबीन खरेदी करण्याचे लक्ष्यांक निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार जिल्हानिहाय जिल्हा मार्केटिंग व विदर्भ मार्केटिंगला सबएजंट नियुक्त करीत ‘नाफेड’ने खरेदी केंद्र सुरू केले.

अमरावती जिल्ह्यात जिल्हा मार्केंटिंगची नऊ व विदर्भ मार्केंटिंगची अकरा अशी वीस केंद्र सुरू करण्यात आली आहे. या केंद्रांवर आतापर्यंत ८ हजार ६६४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली, तरी प्रत्यक्षात ८० शेतकऱ्यांचाच १७३१ क्विंटल सोयाबीन हमीदराने खरेदी करण्यात आला आहे. ‘नाफेड’ केवळ एफएक्यू दर्जाचाच सोयाबीन खरेदी करणार आहे.

शेतकऱ्यांसाठी ही अट जाचक ठरत असून, त्यामुळेच खरेदीचा आकडा रोडावला आहे. अमरावती जिल्ह्यात प्रारंभ झालेल्या वीसपैकी दर्यापूर केंद्रांवर ९१ क्विंटल, नांदगाव खंडेश्‍वर ११२८ व तिवसा केंद्रांवर ४२२ क्विंटल या जिल्हा मार्केटिंगच्या, तर विदर्भ मार्केटिंगच्या अमरावती केंद्रावर ८९ क्विंटल सोयाबीनची हमीदराने खरेदी झाली आहे.

‘नाफेड’च्या सोयाबीन खरेदीची स्थिती

जिल्हा मार्केटिंग एकूण केंद्र ९, नोंदणी ४५७०

प्रत्यक्ष खरेदी १६४२ क्विंटल : शेतकरी संख्या : ७६

विदर्भ मार्केटिंग एकूण केंद्र : ११, नोंदणी : ४०९४

प्रत्यक्ष खरेदी ८९ क्विंटल, शेतकरी संख्या : ४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT