Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : अकोला जिल्ह्यात गेल्या हंगामातील अतिवृष्टिग्रस्तांना ७९ कोटींची मदत

Heavy Rain Crop Loss : गेल्या वर्षीत जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी तसेच पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते.

Team Agrowon

Akola News : गेल्या वर्षीत जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी तसेच पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना शासनाकडून सुमारे ७९ कोटी रुपयांची भरपाई जाहीर झाली होती. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित ५६ हजार ७४८ शेतकऱ्यांना हा लाभ दिला जात आहे.

जिल्ह्यात अकोला तालुक्यासह, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा आणि मूर्तिजापूर या तालुक्यांमध्ये तेंव्हा अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे ५७ हजार ३७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.

जमीन खरडून गेल्याने ४८ शेतकऱ्यांचे ३० हेक्टरचे नुकसान झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला होता. नुकसानग्रस्तांसाठी ७९ कोटी ४८ लाख ५१ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार ही मदत आता सुमारे ११ महिन्यानंतर शेतकऱ्यांना मिळू लागली आहे.

मदतीस पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे काम तहसील कार्यालयांमध्ये सुरू आहे. आजवर जिल्ह्यातील ४६ हजार शेतकऱ्यांची नावे अपलोड झाली आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रियासुद्धा गेल्या चार दिवसांपासून सुरु आहे.

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात असलेली रक्कम 'डीबीटी'द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. दुसरीकडे अद्यापही १० हजारावर शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’ होणे बाकी आहे.

हे कामही सुरु झालेले आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाच्या पोर्टलवर यादी ‘अपलोड’ करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त ५६ हजार ७४८ शेतकऱ्यांपैकी ४६ हजार शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा प्रशासनामार्फत ‘अपलोड’ करण्यात आल्या आहेत. उर्वरित १० हजार ७४८ शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड होणे शिल्लक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT