Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : नांदेडला अवकाळी पावसाने ७८० हेक्टरवर नुकसान

Unseasonal Rain : नांदेड जिल्ह्यात एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ९६९ शेतकऱ्यांच्या ७४५.५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ९६९ शेतकऱ्यांच्या ७४५.५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पावसादरम्यान वीज पडून लहान, मोठी, दुधाळ व ओढकाम करणारी अशी एकूण २३ जनावरांचा मृत्यू झाला तर चार व्यक्ती जखमी झाल्याची माहिती नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मिळाली.

नांदेड जिल्ह्यात दर महिन्याला अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. या पावसादरम्यान वादळी-वारे व गारपीट होत असल्याने शेतीपिकांसह मनुष्य, जनावरांची हानी होत आहे. मार्चमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर एप्रिलमध्ये पुन्हा एकदा जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

यात जिल्ह्यातील ९६९ शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले हा पाऊस नांदेड, अर्धापूर, किनवट, लोहा, मुखेड या तालुक्यात सर्वाधीक झाला. या पावसामुळे जिरायती पिकांचे ३१० हेक्टर, बागायती पिकांचे ४३५ हेक्टर व फळपिकांचे ५२ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

तालुका निहाय नुकसान झालेल्या तालुक्यात अर्धापूर तालुक्यात ४८८ हेक्टर, नांदेड तालुक्यात २४ हेक्टर, किनवट तालुक्यात ३०.२० हेक्टर व लोहा ८.३० हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. नुकसानीबाबत अंतिम अहवालानंतर खरा अंदाज येईल. या आपत्तीत वीज पडून २३ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

यात मोठे दुधाळ जनावरे १७, लहान ओढकाम करणारे जनावरे दोन व मोठी ओढकाम करणारी चार जरावरांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्री तसेच शनिवारी सकाळी अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, टरबूज, खरबूज, भाजीपाला, उन्हाळी ज्वारी, जनावरांचा चारा या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. हा देगलूर, मुखेड, कंधार, लोहा, नायगाव, बिलोली तालुक्यात सर्वाधीक झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT