सांगली जिल्ह्यात केवळ १० टक्के पेरण्या Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : पुणे विभागात ७६ टक्के पेरण्या

Rabi Season : जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे रब्बी पेरण्यांना फारसा वेग आलेला नाही.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे रब्बी पेरण्यांना फारसा वेग आलेला नाही. पुणे विभागात आत्तापर्यंत सरासरीच्या ११ हजार ४९ हजार २६६ हेक्टरपैकी ८ लाख ७१ हजार २८१ हेक्टर म्हणजेच ७६ टक्के पेरण्या झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.


अवकाळी पावसामुळे थंडी कमी असल्यामुळे पेरण्या करण्याचे शेतकऱ्यांनी थांबवले होते. डिसेंबरमध्ये पडलेल्या थंडीमुळे गहू, हरभरा पिकांच्या पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

नगरमध्ये खरीप हंगामातील भात पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. तूर पिकाच्या शेंगा पक्वतेच्या अवस्थेत असून, ३० ते ३५ टक्के क्षेत्रावरील तूर पिकाची काढणी झाली आहे. कापसाच्या ९५ टक्के वेचण्या (३ ते ४ वेचण्या) पूर्ण झालेल्या आहेत. रब्बी हंगामातील ज्वारी पीक कणसात दाणे भरणे व हुरडा अवस्थेत आहे.

गहू पिकाची पेरणी झालेल्या क्षेत्रातील गहू पीक वाढीच्या अवस्थेत आहे. काही भागात गहू पीक ओंब्या लागण्याच्या अवस्थेत आहे. मका पीक वाढीच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकाची काही भागातील पेरणी बाकी असून पेरणी झालेल्या क्षेत्रातील हरभरा पीक फुलोरा व घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. करडई, सुर्यफूल व तीळ पिके वाढीच्या अवस्थेत आहे.

पुणे रब्बी हंगामातील ज्वारी पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. गहू पिकाची पेरणी सुरू असून सद्यःस्थितीत गहू पीक पोटरी अवस्थेत आहे. मका पीक दाणे
भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पीक घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. सोलापूर खरीप हंगामातील तूर पक्वतेच्या व काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आहे.

पावसाच्या खंडामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे तूर पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचे कणीस बाहेर पडण्याच्या अवस्थेत असून पीक परिस्थिती सर्वसाधारण आहे. मका पीक फुलोरा अवस्थेत असून पीक परिस्थिती सर्वसाधारण आहे. सद्यःस्थितीत गहू पीक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत असून पीक परिस्थिती सर्वसाधारण आहे. हरभरा पीक घाटे लागणे ते पक्वतेच्या अवस्थेत आहे.


जिल्हानिहाय झालेली पेरणी (हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी क्षेत्र -- पेरणी क्षेत्र -- टक्केवारी
नगर ४,५८, ६३६ --- ३,६८,६३७ -- ८०
पुणे २,२९,७१२ --- १,४९,०४३ -- ६५
सोलापूर ४,६०,९१८ --- ३,५३, ६०१ --- ७७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT