Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : धाराशिव जिल्ह्यातील २२६ प्रकल्पांतील पाणीसाठा ७५ टक्के

Water Stock : एकूण पाणीसाठ्यात तीन महिन्यांतच सुमारे १४ टक्के घट झाली आहे. दर आठवड्याला सरासरी दोन टक्क्यांनी घट होत आहे.

Team Agrowon

Dharashib News : जिल्ह्यातील २२६ प्रकल्पांतील ७५ टक्क्यांवर गेलेला उपयुक्त पाणीसाठा ६१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यातही संख्येने सर्वाधिक असलेल्या २०८ लघु प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ५३ टक्क्यांवर आलेला आहे. एकूण पाणीसाठ्यात तीन महिन्यांतच सुमारे १४ टक्के घट झाली आहे.

दर आठवड्याला सरासरी दोन टक्क्यांनी घट होत आहे. ही घट अशीच कायम राहिल्यास जूनपर्यंत पाणीसाठा पुरेल. मात्र, उन्हाळ्यात होणारे बाष्पीभवन, अधिकचा पाणीवापर यामुळे उपसा वाढल्यास मे महिन्यात पाणीटंचाई जाणवू शकते. यामुळे प्रकल्पांतील पाणी उपशाचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

पावसाळा अखेरपासून बुधवारपर्यंत (ता. २२) प्रकल्पांतील पाणीसाठ्यात सरासरी १४ टक्के घट झाली आहे. पंधरा दिवसांखाली प्रकल्पांमध्ये ६४.१० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. त्यात ४ टक्के घट होऊन हा पाणीसाठा आता ६१ टक्क्यांवर आला आहे.

सर्वात मोठ्या सीना कोळेगाव प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ८०.५५ टक्के आहे. तो पंधरवड्यापूर्वी ८४.८९ टक्क्यांवर होता. त्यात आतापर्यंत सरासरी १७ टक्क्यांपेक्षा अधिकने घट झाली आहे.

जिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा पंधरवड्यापूर्वी ७१.५६ टक्क्यांवर होता. हा पाणीसाठा आता ६७.७७ टक्क्यांवर आला आहे. तसेच जिल्ह्यातील २०८ लघू प्रकल्पांत पंधरवड्यापूर्वी ५७.३८ टक्के असलेला उपयुक्त पाणीसाठा सध्या ५३.९१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

जिल्ह्यात सध्या केवळ तीन लघु प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत. याशिवाय ७५ टक्क्यांवर उपयुक्त पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांची संख्या ६० वर आली आहे. यात लघु ५१, मध्यम ८ आणि एका मोठ्या प्रकल्पाचा समावेश आहे.

ही संख्या पंधरा दिवसांपूर्वी ८५ होती. म्हणजेच ७५ टक्क्यांवर उपयुक्त पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांत पंधरवड्यात २५ प्रकल्पांची घट झाली आहे. तसेच ५० ते ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांत मात्र १८ प्रकल्पांची वाढ झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT