Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : नाशिकमध्ये अवकाळीचा ७२९ हेक्टरला फटका

Unseasonal Rain : एप्रिलच्या दुसऱ्या सप्ताहापासून उन्हाचा चटका वाढला आहे. तापमानाचा पारा ४० अंशांवर गेला आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सुरगाणा, पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यांत १०७ गावांतील ७२९.६० हेक्टरवरील पिके व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने दिला आहे. सुमारे ३ हजार ५१८ शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आदिवासी भागातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

एप्रिलच्या दुसऱ्या सप्ताहापासून उन्हाचा चटका वाढला आहे. तापमानाचा पारा ४० अंशांवर गेला आहे. ढगाळ वातावरण व उन्हाचा तडाखा बसत असताना सोमवारी (ता. १५) सुरगाणा, बागलाण, पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण आदी भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळीने हजेरी लावली. नंतर सिन्नर तालुक्यात पावसाने दणका दिला. या पावसाचा सर्वाधिक फटका सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यांना बसला आहे.

पावसामुळे ६४९ हेक्टरवरील आंब्याचे नुकसान झाले. ७१.९० हेक्टरवरील कांदा आणि ८.४० हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. सुरगाणा तालुक्यात ६८ गावे (दोन हजार ७७३ शेतकरी), त्र्यंबकेश्वरमधील ३२ गावे (६३७ शेतकरी) आणि पेठ तालुक्यातील ७ गावे (१०८) बाधित झाली. हा नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे.

सुरगाण्यात सर्वाधिक नुकसान

सुरगाणा तालुक्यात पिकांबरोबर अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. पेठ तालुक्यात वीज पडून गोपाळ महाले यांची म्हैस मृत्युमुखी पडली. त्र्यंबकेश्वरमध्ये घरांसह पिकांचे नुकसान झाले.

जिल्ह्यातील बहुतांश भाग दुष्काळाला तोंड देत आहे. त्यात नैसर्गिक आपत्तीचे संकट कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला. ६४९ हेक्टरवरील आंबा, ७१.९० हेक्टरवरील कांदा आणि ८.४० हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT