Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : सातारा जिल्ह्यात रब्बी ज्वारीची ७१ टक्के पेरणी

Rabi Season : सातारा जिल्ह्यात रब्बी हंगामात ६५.९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दुष्काळी तालुक्यासह सर्वच तालुक्यात रब्बी ज्वारी करण्याकडे कल वाढला असून ७१ टक्के पेरणीची काम पूर्ण झाले आहे.

Team Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्यातील मागील सप्ताहात झालेल्या पाऊस रब्बी हंगामाच्या दृष्टीने उपयुक्त ठरत असून पेरणीच्या कामांना गती येऊ लागली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात ६५.९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दुष्काळी तालुक्यासह सर्वच तालुक्यात रब्बी ज्वारी करण्याकडे कल वाढला असून ७१ टक्के पेरणीची काम पूर्ण झाले आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीच्या कामांना वेगात आला आहे. हरभरा आणि गहू पिकांची कामेही सुरू झाली आहेत. जिल्ह्यात रब्बी ज्वारीची सर्वाधिक पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात रब्बी ज्वारी दरात वाढ झाल्याने ज्वारी करण्याकडे कल वाढला आहे.

पूर्वेकडील माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव तालुक्यांत एकूण पेरणीपैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक रब्बी ज्वारीची लागवड होत आहे. धान्य उत्पन्नाबरोबर चाऱ्यास ही रब्बी ज्वारी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पेरणी केली जात आहे. त्याचबरोबर रब्बी ज्वारीच्या कडब्यास मागणी चांगली राहत आहे.

त्यामुळे दरही समाधानकारक मिळत आहेत. मागील पाच ते सात वर्षांपासून पश्चिमेकडील बागायत तालुक्यातही रब्बी ज्वारी करण्याकडे कल वाढला आहे. टोकण पद्धतीने ज्वारी केली जात असून पाण्याची उपलब्धता असल्यामुळे दोन ते तीन पाण्याच्या पाळ्याही दिल्या जातात.

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे दोन लाख १३ हजार २०९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून यापैकी एक लाख ४० हजार ६४५ हेक्टर म्हणजेच ६५.९७ टक्के झाली आहे. तर रब्बी हंगामातील रब्बी ज्वारीचे एक लाख ३५ हजार ५३१ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यापैकी ९७ हजार ९२ हेक्टर म्हणजेच ७१.६४ टक्के लागवड झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT