Turmeric Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Cultivation : देशात ७० टक्के हळदीची लागवड

Turmeric Production : यंदा क्षेत्र वाढण्याचा अंदाज; १५ दिवसांत लागवड उरकणार

Team Agrowon

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा
Sangali News : सांगली : देशात वाढत्या तापमानामुळे हळद लागवड उशिरा सुरू झाली आहे. बहुतांश भागात लागवडीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे. तसेच गेल्या दहा दिवसांपासून देशातील हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद लागवडीस प्रारंभ केला असून, आजअखेर ७० टक्के हळदीची लागवड पूर्ण झाली असल्याची माहिती हळद संशोधन केंद्राने दिली.

गतवर्षीच्या हंगामात अपुरा पाऊस आणि पाण्याची कमतरता त्याचबरोबर हळदीला अपेक्षित दर नसल्याने हळदीच्या क्षेत्रात घट झाली होती. त्यामुळे हळदीच्या दारात दुप्पट वाढ झाली. मात्र या वर्षी पाणीटंचाईचा फटका देशभरातील हळद उत्पादन घेणाऱ्या राज्याला बसला. त्यामुळे अक्षय तृतीयेपासून सुरू होणारी हळदीची लागवड लांबणीवर पडली. तरीही शेतकऱ्यांनी हळदीचे बियाणे खरेदी करून ठेवले होते. शेतकऱ्यांनी एप्रिल-मे महिन्यांत हळद लागवडीसाठी पूर्व मशागती उरकल्या. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत होते.

महाराष्ट्रातील बहुतांश भागात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून शेतकऱ्यांनी हळद लागवडीस प्रारंभ केला. दरम्यान, महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू यांसह अन्य राज्यांत मे महिन्यापासून पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिसाला मिळाला असल्याने शेतकऱ्यांनी हळद लागवडीचे नियोजन सुरू केले असल्याचे चित्र आहे. जून महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद लागवड सुरू केली आहे. शिवारात हळद लागवडीची धांदल सुरू आहे. सध्या हा पाऊस हळद लागवडीसाठी उपयुक्त ठरत आहे. देशात आजअखेर ७० टक्के हळदीची लागवड झाली असून येत्या पंधरवड्यात हळदीची लागवड पूर्ण होईल.

यंदा क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता
देशात गतवर्षी ३ लाख २५ हजार हेक्टरवर लागवड झाली असून, ५५ ते ६० लाख पोत्यांचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले होते. गेल्या चार वर्षांत हळदीला अपेक्षित दर नव्हते. त्‍यातच कमी पाऊस आणि पाणीटंचाई यामुळे हळदीचे क्षेत्र कमी झाले होते. परिणामी, हळदीचे उत्पादन कमी झाल्याने हळदीच्या दरात दुप्पट वाढ झाली. यामुळे यंदाच्या हंगामात शेतकरी हळद लागवडीकडे वळाले असल्याचे चित्र आहे. या वर्षी साडेतीन लाख हेक्टरहून अधिक हळदीचे क्षेत्र होईल, असा अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे.

राज्यनिहाय हळद लागवडीचे अंदाजे चित्र
राज्य... लागवड टक्के
आंध्र प्रदेश...७० टक्के
तेलंगणा...८० टक्के
महाराष्ट्र...६० टक्के
तमिळनाडू...५२ टक्के
कर्नाटक...६६ टक्के
ओडिशा....५५ टक्के


यंदाचा हळद लागवड अति उष्णतेमुळे उशिरा सुरू झाली आहे. परंतु पूर्वमोसमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी हळद लागवड सुरू केली आहे. देशात ७० टक्के हळदीची लागवड उरली आहे. येत्या पंधरा दिवसांत हळदीची लागवड पूर्ण होईल.
- डॉ. मनोज माळी,
प्रभारी अधिकारी, हळद संशोधन, योजना कसबेडिग्रज, जि. सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT