APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Sindhudurg APMC : सिंधुदुर्गात मार्केट यार्डचा ७० कोटींचा आराखडा

APMC News : सिंधुदुर्गात मार्केटयार्ड नसल्यामुळे जिल्ह्यातील उत्पादित माल वाशी किवा अन्य मार्केटयार्डमध्ये जात आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यातील नांदगाव रेल्वे स्थानकानजीक वाघेरी येथे उभारल्या जाणाऱ्या मार्केटयार्डसाठी ७० कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून यामध्ये काजू बीकरिता गोदाम, २९ गाळे, शीतगृह, खुल्या लिलावाकरिता जागा, स्वच्छतागृह यासह विविध पायाभूत सुविधांचा समावेश आहे.

सिंधुदुर्गात मार्केटयार्ड नसल्यामुळे जिल्ह्यातील उत्पादित माल वाशी किवा अन्य मार्केटयार्डमध्ये जात आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात मार्केट यार्ड उभारण्यात यावे, अशी मागणी सुरू होती.

या मागणीची दखल घेऊन जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने नांदगाव रेल्वे स्थानकानजीक वाघेरी येथे मार्केट यार्ड करिता ४ हेक्टर ९१ गुंठे जागा खरेदी केली आहे. या जागेत आता मार्केट यार्ड उभारण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, भात, मत्स्यव्यवसाय यासह विविध सकारात्मक हेतुने या मार्केट यार्डच्या उभारणीकरिता ७० कोटींच्या आराखड्यााला पणन संचालक पुणे यांची मान्यता मिळाली.

जिल्ह्यात मार्केट यार्ड नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कुचंबणा झाली होती. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केट यार्ड उभारण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. पणन संचालक पुणे यांची आराखड्याला मंजुरी मिळाली. लवकरच भुमिपूजन होईल.
- तुळसीदास रावराणे, अध्यक्ष, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT