Hapus Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Hapus Mango : मुहूर्ताच्या ‘हापूस’ला ७ हजार ७०० दर

Mango Season : एका आंब्याची किंमत जवळपास ३२१ रुपये एवढी झाली. या तीनही पेट्यांपोटी २३ हजार ११२ रुपये मिळाले.

राजेश कळंबटे

Ratnagiri News : तालुक्यातील हर्णे येथून हापूस आंब्याच्या मुहूर्ताच्या दोन डझनाच्या तीन पेट्या मुंबई मार्केटमध्ये पाठविण्यात आल्या, या पेटीला ७ हजार ७०० रुपये मिळाले.

दापोली तालुक्यातील ही पहिली पेटी आंबा बागायतदार सागर मयेकर यांची आहे. एका आंब्याची किंमत जवळपास ३२१ रुपये एवढी झाली. या तीनही पेट्यांपोटी २३ हजार ११२ रुपये मिळाले.

पिकलेला आंबा हा दरवर्षी एप्रिलमध्ये बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. दापोलीतील आंबा विक्री व्यवसायाला साधारण दोन महिने अगोदरच मुहूर्त झाला.

हंगामातील पहिला आंबा काढल्यानंतर सागर मयेकर यांनी आंब्याच्या तीनही पेट्या देव्हाऱ्यात ठेवून विधिवत पूजा केली.

याबाबत बागायतदार मयेकर म्हणाले, की आमच्या हर्णै परिसरामध्ये आंब्याला पोषक वातावरण आहे. आमच्या बागेतील झाडांना चांगले उत्पादन येईल अशी अपेक्षा आहे. सुरुवातीलाच एकदम तीन पेटी आंबा मिळाला असून दरही चांगला मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT