Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2024 : सांगलीतील १४ कारखान्यांकडून ७ लाख टन उसाचे गाळप

Sugarcane Crushing : यंदाच्या गाळपासाठी १ लाख ३७ हजार १०३ हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. जिल्ह्यात १६ साखर कारखाराने आहेत. त्यापैकी ९ सहकारी आणि ४ खासगी कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. या कारखान्यांनी गेल्या १५ दिवसांत ८ लाख ५८ हजार १४४ टन गाळप करून ७ लाख ६९ हजार ०३५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

दरम्यान, ऊस दराची कोंडी न फुटताच कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

शेतकरी संघटनांनी मात्र गेल्या काही दिवसांपासून संयमाची भूमिका घेतली होती मात्र, गेल्या दोन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. यंदाच्या गाळपासाठी १ लाख ३७ हजार १०३ हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. जिल्ह्यात १६ साखर कारखाराने आहेत. त्यापैकी ९ सहकारी आणि ४ खासगी कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस गाळपास गती घेतली आहे. कुंडल येथील क्रांती साखर कारखान्याने सर्वाधिक उसाचे गाळप करत साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. तर ‘उदगिरी शुगर’ साखर उताऱ्यात पिछाडीवर आहे. ‘केन ॲग्रो’ गाळप आणि साखर उत्पादनात सर्वांत मागे आहे.

चार ते पाच वर्षांपूर्वी कारखाना सुरू होण्यापूर्वी ऊसदराची कोंडी फुटली जायची. गेल्या तीन वर्षांपासून साखर कारखाने गाळप हंगाम सुरू करतात, परंतु ऊस दराबाबत कोणतीही भूमिका घेत नाहीत. त्यामुळे ऊस दराची कोंडी निर्माण होते. त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस परिषदेत ऊस दराची भूमिका जाहीर करते.

मात्र, याकडे साखर कारखानादार काणाडोळा करतात. परिमाणी आंदोलन करावे लागते. त्यातून दराचा तिढा सुटला जातो. सर्व कारखान्यांनी गळीत हंगामात आघाडी घेतली असली तरी ऊस दराची कोंडी फुटलेली नाही.

शेतकरी संघटनांनी सध्या तरी संयमाची भूमिका घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा यासाठी आक्रमक भूमिका घेऊ लागली आहे. यामुळे ऊस दराबद्दल निर्णय होणार की नाही, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT