Sugarcane  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Harvesting : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६५ टक्के ऊसतोडणी पूर्ण

Sugarcane Season : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६५ टक्के ऊसतडणी पूर्ण झाली असून आतापर्यंत ३८ हजार टन उसाची तोडणी झाली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६५ टक्के ऊसतडणी पूर्ण झाली असून आतापर्यंत ३८ हजार टन उसाची तोडणी झाली आहे. दहा मार्चपर्यंत जिल्ह्यातील ११०० हेक्टरवरील ऊसतोडणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कारखाना प्रशासनाचे आहे.

यावर्षीचा गाळप हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. सुरुवातीचे दहा बारा दिवस तोडणीला अपेक्षित गती मिळाली नव्हती. परंतु त्यानंतर तोडणी मजुरांच्या संख्येत वाढ झाली. सिंधुदुर्गातील बहुतांश ऊस गगनबावडा असळज येथील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याला नेला जातो.

जिल्ह्यात वैभववाडी, कणकवली तालुक्यांत ऊस लागवडीचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय मालवण आणि कुडाळ तालुक्यांतदेखील काही प्रमाणात ऊसलागवड आहे. यावर्षी जिल्ह्यात १ हजार १०० हेक्टरवर ऊसलागवड आहे. गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील ३८ हजार टन उसाची तोडणी पूर्ण झाली आहे. हे प्रमाण ६५ टक्के असून अजूनही ३५ टक्के ऊसतोडणी शिल्लक आहे. ही तोडणी येत्या १० मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कारखाना प्रशासनाचे आहे.

करूळ घाटरस्ता नूतनीकरणामुळे विलंब सिंधुदुर्गातून होणारी ऊस वाहतूक करूळ घाटमार्गे व्हायची परंतु यावर्षी सुरुवातीला घाटरस्ता नादुरुस्त असल्यामुळे आणि आता काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे घाटरस्ता वाहतुकीस बंद आहे. त्यामुळे ऊस वाहतूक भुईबावडा घाटमार्गे करावी लागत आहे. त्याचा परिणाम ऊसतोडणीवर झाला आहे.

सिंधुदुर्गातील ऊसतोडणी गतीने सुरू असून अंतिम टप्प्यात आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांत तोडणीचे काम पूर्ण होईल.
- बी. जी. शेळके, पर्यवेक्षक, डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना, असळज

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

Maharashtra Assembly Election Result 2024 : ‘ते’ पुन्हा आले!

Vidhansabha Election 2024 : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महायुतीचाच प्रभाव

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT