Soybean Seed Germination Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean : यंदाच्या खरिपात सोयाबीन बियाणे उगवणीच्या ६२ तक्रारी

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याच्या उगवणी, दर्जाबाबत तक्रारींचा ओघ कमी झालेला आहे.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याच्या उगवणी, (Soybean Seed Germination) दर्जाबाबत तक्रारींचा ओघ कमी झालेला आहे. हंगामात केवळ ६२ तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या होत्या. यापैकी १५ प्रकरणांत संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांनी परस्पर मदत देऊन प्रकरणे मिटवली आहेत. तर काहींना भरपाईसाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण कक्षात दाद मागता येईल, असा सल्ला देण्यात आला आहे.
खरीप हंगामात बियाणे उगवणीबाबत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या तक्रारी होत असतात. यंदाही तक्रारी झाल्या; मात्र, या तक्रारींचा ओघ काहीसा कमी राहला. १५ शेतकऱ्यांच्या तक्रारी संबंधित कंपन्यांनी आपल्या स्तरावर सोडवल्या. १४ शेतकऱ्यांना अकोल्यातीलच एका उत्पादक कंपनीने २ लाख ११ हजारांची परस्पर मदत तक्रारदारांना केली. दुसऱ्या कंपनीने एका शेतकऱ्याला सोयाबीनच्या तीन बॅग दिल्या. यानंतर राहिलेल्या ४७ तक्रारींपैकी १५ तक्रारीत बियाण्यात दोष असल्याचे समोर आले. दोष आढळून आलेल्या तक्रारींमध्ये तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने तथ्य असल्याचा अहवाल दिला आहे. यामुळे तक्रारदारांना आता जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागणे शक्य होणार आहे.

घरचे बियाणे वापरूनही तक्रारी कमी
बियाणे उत्पादक कंपन्यांकडून संकरित बियाणे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचे प्रमाण दरवर्षी मोठ्या प्रमाणात राहते. यंदा जिल्ह्यात बहुतांश प्रमाणात घरगुती बियाणे वापरण्यात आले आहे. असे असतानाही बियाणे उगवणीबाबत संख्येने अत्यंत कमी तक्रारी राहल्या. याचाच अर्थ शेतकऱ्यांनी पेरलेले घरचे बियाणेसुद्धा दमदार उगवले आहे. यामुळे पुढील हंगामात शेतकऱ्यांचा घरच्या बियाण्यावरील विश्‍वास वाढून लागवडीकडील कल अधिक निर्माण होऊ शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT