Sand Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Sand Storage : छत्रपती संभाजीनगरच्या ५ डेपोंमध्ये ६१ हजार ब्रास वाळूचा साठा

Sand Mining : जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांसाठी, नागरिकांसाठी, खाजगी प्रकल्प आणि शासकीय कामांसाठी लागणाऱ्या वाळूची डेपोनिहाय उपलब्धता जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आली आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांसाठी, नागरिकांसाठी, खाजगी प्रकल्प आणि शासकीय कामांसाठी लागणाऱ्या वाळूची डेपोनिहाय उपलब्धता जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात सद्यःस्थितीत पाच डेपोंवर सर्व मिळून ६१ हजार ०७७.०१ ब्रास वाळू उपलब्ध आहे.

ही वाळू रीतसर मागणी नोंदवून व शुल्क भरून उपलब्ध आहे. घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत उपलब्ध आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना बांधकाम योग्य वाळू खरेदीसाठी जिल्हा खनिकर्म विभागामार्फत वाळू घाट व वाळू डेपो येथे उपलब्ध वाळूबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच वाळू खरेदीबाबत सूचनाही जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके यांनी दिल्या आहेत.

त्यानुसार वाळू खरेदीसाठी ग्राहकास सेतू केंद्र छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय किंवा सर्व तहसील कार्यालयाचे सेतू व इतर १४५ सुविधा केंद्रात जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. गरजेनुसार नागरिकांनी वाळू खरेदीसाठी मागणी नोंदवावी. घरकुल लाभार्थी व सर्वांना वाळूची नोंदणी करतांना २५ रुपये सेतू नोंदणी शुल्क जमा करावे लागेल.

नोंदणी करताना रेशन कार्ड, आधार कार्ड, घरकुल प्रमाणपत्र बांधकाम परवानगी सोबत आवश्यक घेऊन यावे. तसेच नोंदणी करतांना मोबाइल क्रमांक अनिवार्य असून, ओटीपीसाठी मोबाइल सोबत घेऊन यावेत. घरकुल योजनेतील लाभार्थी यांना ५ ब्रास वाळू मोफत मिळेल. एका कुटुंबास एका वेळी कमाल १० ब्रास इतक्या मर्यादेत वाळू मिळेल. नंतर वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यानंतर वाळूची मागणी ग्राहकास करता येईल.

नोंदणी झाल्यानंतर बुकिंग आयडी असलेली पावती प्राप्त करून सदर पावती वाळू डेपोवरील डेपो मॅनेजरला दाखवून वाहतूक पावती प्राप्त (ETP) करून घ्यावी. डेपोपासून बांधकाम ठिकाणचा वाहतूक खर्च भरण्याची जबाबदारी नोंदणी केलेल्या व्यक्तीची राहील.

शासनाच्या अधिकृत वाळू डेपो वरून वाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंदणी महाखनिज वेबसाइटवर ट्रापोर्टर म्हणून करणे गरजेचे आहे. सदर वाहनांवर AIS-140(IRNSS) प्रमाणीकरण असलेली जीपीएस यंत्रणा आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT