Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Supply : दहा लाख वीजग्राहकांना सहा कोटींचा परतावा

Electricity Update : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युतपुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते.

Team Agrowon

Nanded Electricity News : महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी नांदेड परिमंडल अंतर्गत येणाऱ्या नांदेड, परभणी तसेच हिंगोली जिल्ह्यातील लघू दाब वर्गवारीतील दहा लाख ७२ हजार ७०२ वीजग्राहकांना सहा कोटी तीन लाख २१ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.

सन २०२२-२०२३ करिता ही रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये समायोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युतपुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्‍चित करण्यात येते.

वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल, तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीड पट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे.

आकडेवारी अशी...

नांदेड जिल्ह्यातील लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषीपंप तसेच इतर वर्गवारीतील पाच लाख ८३ हजार ६६ वीजग्राहकांना तीन कोटी २१ लाख ३९ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.

तर परभणी जिल्ह्यातील दोन लाख ९५ हजार ६२५ ग्राहकांना एक कोटी ६८ लाख ४७ हजार रुपयांचा, त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील एक लाख वीजग्राहकांना एक कोटी १३ लाख रुपयांचा परतावा सुरक्षा ठेवीवरील व्याजापोटी वीजबिलांमध्ये समायोजित करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT