Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Supply : पैसे भरूनही वीज जोडणीचे ५,९०८ प्रस्ताव प्रलंबित

Electricity Issue : कृषी पंपाच्या जोडणीसाठी जिल्ह्यात एकूण दहा हजार ५६५ प्रस्ताव मार्च २०२२ पर्यंत प्रलंबित होते.

Team Agrowon

Electricity Yavatmal News : कृषिपंपाच्या वीज जोडणीसाठी पैसे भरूनही जिल्ह्यात मार्च २०२२ पर्यंत प्रलंबित असलेल्या सर्व जोडण्या पूर्ण करण्यासाठी महावितरणाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ३० जूनचा अल्टिमेटम दिला आहे. पैसे भरूनही पाच हजार ९०८ प्रस्ताव प्रलंबित आहेत.

महावितरणच्या विविध विषयांचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महसूल भवन येथे घेतला.

यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत, यवतमाळ विभागाचे कार्यकारी अभियंता संजय खंगार, पुसदचे कार्यकारी अभियंता संजय आडे, पांढरकवडा नरेंद्र कटारे, दारव्ह्याचे योगेश तायडे उपस्थित होते.

कृषी पंपाच्या जोडणीसाठी जिल्ह्यात एकूण दहा हजार ५६५ प्रस्ताव मार्च २०२२ पर्यंत प्रलंबित होते. यात दारव्हा विभागात २, ८६६ प्रलंबित अर्जापैकी ९१६ अर्ज मंजूर केले असून, ३१७ अर्ज रद्द केले.

१,६३३ अर्ज प्रलंबित आहे. तसेच पांढरकवडा विभागात १,९५४ प्रलंबित अर्जांपैकी १६५ अर्ज रद्द केले होते. ९१८ लोकांना जोडणी दिली. ८७१ अर्ज प्रलंबित आहेत. सर्व विभागात ३,५९३ प्रलंबित अर्जांपैकी ३४४ अर्ज रद्द केले आहेत.

एकूण १,१९१ शेतकऱ्यांना जोडणी देण्यात आली आहे. २,०५८ अर्ज प्रलंबित आहेत. यवतमाळ तालुक्यातील यवतमाळ उपविभागात २,१५२ प्रलंबित अर्जापैकी २५१ अर्ज रद्द करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT