Agricultural Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : सिंचनासाठी ५४ टीएमसी पाणी उपलब्ध

Irrigation : सिंचनासाठी उपलब्ध साठा शंभर टक्के उचलता येणार नाही, मात्र यंदा केवळ चारच महिने आवर्तन चालणार आहे.

Team Agrowon

Sangli News : कोयना आणि चांदोली धरणातून यंदा सिंचनासाठी ५४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असणार आहे. सिंचनासाठी उपलब्ध साठा शंभर टक्के उचलता येणार नाही, मात्र यंदा केवळ चारच महिने आवर्तन चालणार आहे. परिणामी, पुरून उरेल, इतके पाणी हाताशी आहे. केवळ एप्रिल-मेमध्ये आवर्तनाच्‍या फेऱ्यांमधील ताण टाळण्याचे आव्हान पाटबंधारे विभागाला पेलावे लागणार आहे.

टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांमधून शेतकऱ्यांनी अद्याप पाणी मागणी नोंदवलेली नाही. पाटबंधारे विभागाने पंप आणि कालव्यांच्या तपासणीसाठी आवर्तन चालवले आहे. फेब्रुवारीच्या सुरवातीपासून आवर्तन नियमित सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे चारच महिने यंदा आवर्तन चालणार आहे.

चांदोली धरणातून ११.५४, तर कोयना धरणातून ४२.७० टीएमसी पाणीसाठा सिंचनासाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे. यंदा तो पूर्ण क्षमतेने वापरता येणार आहे, मात्र वास्तवात पाणी शिल्लक राहील, अशी परिस्थिती आहे. परिणामी, कर्नाटक सरकारने एप्रिल-मेमध्ये मागणी केल्यास यंदा महाराष्ट्रातून पाणी उपलब्ध करून दिले जाऊ शकते, अशी स्थिती आहे.

चार महिने आवर्तन

यावर्षी फेब्रुवारी ते मे असे चार महिने आवर्तन चालेल. सध्या म्हैसाळ योजनेचे तपासणी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. मात्र अद्याप शेतकऱ्यांनी मागणी नोंदवलेली नाही. मागणी अर्ज दाखल झाल्यानंतर नियमित आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. गतवर्षी तब्बल आठ महिने आवर्तन सुरू होते. दुष्काळी परिस्थितीमुळे नोव्हेंबरपासून सातत्याने कालवे सुरू होते.

भारनियमनाचे संकट कमी

कोयना धरणातून केल्या जाणाऱ्या वीजनिर्मितीसाठी प्रतिवर्षी ६७.५० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध केला जातो. १ जून ते ३१ मे हे वर्ष ग्राह्य मानून नियोजन केले जाते. यावर्षी पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात भारनियमनाचे संकटही कमी असेल.

टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांचे आवर्तन सुरू करण्याची आमची तयारी पूर्ण झाली आहे. तपासणी आवर्तन सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन आम्ही केले आहे. यंदा पाऊस अधिक झाल्याने अद्याप विहिरी, कूपनलिकांमध्ये पाणी आहे. हळूहळू मागणी वाढेल, यंदा आवर्तनांवर फार ताण येणार नाही, अशी अपेक्षा आहे.
- चंद्रशेखर पाटोळे, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT