Abdul Sattar
Abdul Sattar Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : राज्यात ५३ हजार ४४ कोटी पीक कर्जाचे वाटप; जिल्हामध्यवर्ती बँकांवर कृषिमंत्र्यांनी उधळली स्तुतीसुमने

Team Agrowon

Crop Loan : राज्यातील शेतकऱ्यांसाठी २०२२-२३ मध्ये ५३ हजार ४४ कोटी पीक कर्ज वाटप केले आहे. एकूण उद्दिष्ट्याच्या ते ८४.७४ टक्के आहे.

राज्य सरकारने २०२२-२३ साठी ६१ हजार कर्जवाटपाचे लक्ष्य ठेवले होते, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत दिली.

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान दिले आहे.

त्याचा लाभ राज्यातील १२ लाख ८४ हजार ६६३ शेतकऱ्यांना झाला आहे.

उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही योजनेतंर्गत लाभ देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती सत्तारांनी सभागृहाला दिली.

यावेळी त्यांनी राज्यातील जिल्हामध्यवर्ती बँकांचे कौतुक केले.

राज्यातील जिल्हामध्यवर्ती बँकां शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप उत्तम पद्धतीने करत आहेत, असेही सत्तार म्हणाले.

राज्यातील ३१ बँकांपैकी २१ जिल्हा मध्यवर्ती बँकां नफ्यात आहेत. तर १० जिल्हा मध्यवर्ती बँका तोट्यात आहेत. त्यामध्ये वर्धा, डिसीसी बँकेचा समावेश आहे.

परंतू तरीही जिल्हा मध्यवर्ती बँकांनी पीक कर्ज वाटपात कौतुकास्पद काम केले आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना कुठल्याही सीबील स्कोअरविना पीक कर्ज पुरवठा करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही सुरू असल्याचे सत्तार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसामुळे शेकडो संसार उघड्यावर

Turtle Conservation Issue : रायगडमध्ये तापमानवाढीमुळे कासवसंवर्धन संकटात

Forest Fire Himachal : उत्तराखंडसारखीच आगीमुळे हिमाचलची अवस्था, भाजपचा हल्लाबोल, गावकऱ्यांचा इशारा

Summer Heat : उष्णता वाढली पारा ४५ अंश सेल्सिअसवर

Agrowon Podcast : गव्हाच्या भावात सुधारणा ; कापूस, सोयाबीन, हळद, तसेच काय आहेत गहू दर ?

SCROLL FOR NEXT