Ambegaon Tehsil Office Agrowon
ॲग्रो विशेष

Revenue Lok Adalat: घोडेगावला महसूल लोक अदालतीत ५२ प्रकरणे निकाली

Tehsil offfice: तहसील कार्यालयात महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर ५२ प्रकरणे निकाली, तर १२७ प्रकरणांमध्ये नोटिसा काढण्यात आल्या असल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार संजय नागटिळक यांनी सांगितले.

गणेश कोरे

Ghodegaon News: तहसील कार्यालयात महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर ५२ प्रकरणे निकाली, तर १२७ प्रकरणांमध्ये नोटिसा काढण्यात आल्या असल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार संजय नागटिळक यांनी सांगितले.

महसूल दाव्यांमध्ये दोन्ही पक्षकार तडजोडीसाठी तयार असल्यास महसूल संख्या कमी होण्यासह सामंजस्याने न्याय मिळविणे सोपे होण्याच्या दृष्टीने आंबेगाव तालुका तहसील कार्यालय घोडेगाव येथे महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महसूल व उपविभागीय अधिकारी यांच्याकडील प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.

महसूल प्रशासनातील मंडल अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडील अर्धन्यायिक कामकाजामध्ये अनेक वेळा महसुली दावे दाखल झाल्यानंतर विविध कारणांमुळे प्रलंबित राहतात. त्यामुळे बऱ्याच वेळा पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. त्यानंतर जेव्हा दाव्यांचे निकाल दिले जातात तेव्हा एका पक्षाचे समाधान झाले नाही तर ते वरिष्ठ न्यायालयात पुन्हा प्रतिदावे दाखल करतात.

विशेषतः जमिनींशी संबंधित प्रलंबीत दाव्यांमध्ये महसुली दाव्यांचे प्रमाण मोठे असून वारंवार महसुली दावे दाखल झाल्यामुळे वर्षानुवर्षे महसुली दावे चालू राहतात. ते निकाली काढण्यासाठी या लोक अदालतीचे आयोजन आंबेगाव तालुक्यातील सर्व मंडल, तहसील व प्रांत कार्यालयात एकाच वेळी करण्यात आले.

या वेळी प्रांत अधिकारी गोंविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, नायब तहसिलदार सचिन वाघ, शांताराम किर्वे, घोडेगाव बार आसोशिएशन अध्यक्ष ॲड. समिर निघोट, ॲड. संजय आर्विकर, ॲड. श्रीराम बांगर, ॲड. मधुकर सूर्यवंशी, ॲड. आकाश काळे, ॲड. संदिप टेमगिरे, ॲड. हनुमंत पर्वत, ॲड. भूषण शिंदे व पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते.

दीर्घकाळ चालणाऱ्या महसुली दाव्यांमध्ये तडजोड झाल्याने काही प्रमाणात अर्धन्यायिक यंत्रणेवर पडणारा ताण कमी होऊन पक्षकारांनाही समाधान मिळू शकेल. दाव्यांचा कमी कालावधीत व सहमतीने निकाल प्राप्त झाल्यामुळे वेळेची मोठी बचत होईल. या प्रकारच्या दाव्यांमध्ये फीची आवश्यकता नसल्याने पक्षकांरांवरील आर्थिक भार कमी होईल.

सामंजस्यावर आधारित यंत्रणा असल्यामुळे न्याय मिळविणे तुलनेने सहज व सुलभ होणार आहे. या महसूल लोक अदालतीसाठी घोडेगाव बार आसोशिएशनचे सहकार्य मिळाले असल्याचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: एका दिवसात ८४६८ हेक्टरला फटका

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगरमध्ये पूर्वमोसमी पावसाचा पिकांना फटका

Food Processing License: अन्नप्रक्रिया परवाना नूतनीकरणाची अट रद्द

Revenue Department: शासकीय तिजोरीत ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा

Lemon Price Drop: ऐन उन्हाळ्यात लिंबांच्या दरात घसरण

SCROLL FOR NEXT