Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : सोलापूर विभागात ५०२ कोटी रुपयांची एफआरपी थकीत

FRP Update : यंदाच्या गाळप हंगामात सोलापूर विभागातील ३३ कारखान्यांकडे १५ फेब्रुवारीअखेर ५०२.३२ कोटी रुपये एफआरपी थकली आहे.

Team Agrowon

Solapur News : यंदाच्या गाळप हंगामात सोलापूर विभागातील ३३ कारखान्यांकडे १५ फेब्रुवारीअखेर ५०२.३२ कोटी रुपये एफआरपी थकली आहे. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील २५ कारखान्यांनी ४१२.४९ कोटी रुपये एफआरपी थकविली आहे. सोलापूर विभागात सोलापूर व धाराशिव जिल्हे समाविष्ट आहेत. यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील ३५ तर धाराशिव जिल्ह्यातील १४ अशा एकूण ४९ कारखान्यांनी हंगाम घेतला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ३५ कारखान्यांनी बेसिक रिकव्हरीनुसार एफआरपीचे दोन हजार ५४१ कोटी व धाराशिव जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ७०६ कोटी असे एकूण तीन हजार २४७ कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना दिले आहेत. सोलापुरातील २५ कारखान्यांकडे ४१३ कोटी तर धाराशिवमधील ८ कारखान्यांकडे एफआरपीचे ९० कोटी रुपये थकीत आहेत.

कारखानानिहाय १५ फेब्रुवारीअखेरची थकीत एफआरपी ( रु. कोटी)

सोलापूर जिल्हा

कारखाना थकीत एफआरपी

सिद्धेश्वर १९.५५

संत दामाजी १६.२०

संत कुर्मदास ७.८७

लोकनेते ३७.६७

सासवड माळी १२.९९

लोकमंगल,बिबीदारफळ ४.२९

लोकमंगल,भंडारकवठे १४.८५

विठ्ठल कार्पोरेशन ४१.३८

सिद्धनाथ ७.३६

जकराया १४.१९

इंद्रेश्वर १४.३३

भैरवनाथ,विहाळ १९.६८

भैरवनाथ,लवंगी १७.३६

युटोपियन ४.०५

मातोश्री २०.२५

भैरवनाथ,आलेगाव १३.७३

बबनरावजी शिंदे १७.६६

जयहिंद ४१.१८

विठ्ठल रिफाइंड २५.२५

आष्टी शुगर ५.५१

भीमा १९.५६

सहकार शिरोमणी १.६१

धाराशिव,सांगोला १०.०२

विठ्ठल,वेणूनगर २३.४९

येडेश्वरी २.५६

धाराशिव जिल्हा-

विठ्ठलसाई २८.२९

भैरवनाथ(शिवशक्ती) ६.०७

भीमाशंकर ०.१०

भैरवनाथ,सोनारी २०.६४

लोकमंगल माऊली १३.४६

क्यूएनर्जी ०.४३

गोकूळ शुगर १२.५४

भैरवनाथ(तेरणा) १८.४०

थकीत एफआरपीबाबत १४ फेब्रुवारीला साखर सहसंचालकांना निवेदन दिले आहे. ती मिळण्यासाठी २ मार्चपासून आंदोलन करणार आहे. जाळून गाळप केलेल्या उसाला एफआरपीप्रमाणे दर मिळायला हवा.
विजय रणदिवे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT