Grape Farmer Fraud  Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Farmer Fraud : द्राक्ष बागायतदारांची ५० कोटींची फसवणूक

Fraud Complaints : नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांनी त्यांच्या द्राक्षमाल व्यवहारातील पैशांची फसवणूक झाल्याच्या लेखी स्वरूपात तक्रारी व निवेदने आलेली आहेत.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांनी त्यांच्या द्राक्षमाल व्यवहारातील पैशांची फसवणूक झाल्याच्या लेखी स्वरूपात तक्रारी व निवेदने आलेली आहेत.

यात जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक द्राक्ष बागायतदारांची स्थानिक व्यापारी व निर्यातदारांकडून गत हंगामात सुमारे ५० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. अजून अर्ज येत असून यात वाढ होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या ओझर येथील विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत श्री. भोसले बोलत होते. भोसले म्हणाले, की उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे द्राक्ष बागायतदारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात भेट घेतली होती.

त्यामध्ये बागायतदारांची देशांतर्गत व्यापारी तसेच निर्यातदारांकडून झालेल्या फसवणुकीची माहिती दिली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना यासंदर्भात लक्ष घालून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार कैलास भोसले, नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब गडाख, सचिव बबनराव भालेराव, संचालक अॅड. रवींद्र निमसे आदींसह शिष्टमंडळाने दत्तात्रय कराळे यांची भेट घेऊन झालेल्या फसवणुकीच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT