Valmik Karad agrowon
ॲग्रो विशेष

Valmik Karad : वाल्मीक कराड राहिलेल्या कोठडीमध्ये ५ नवीन पलंग, विरोधकांचा सरकारवर निशाणा

Congress Vijay Vadettiwar : महायुती सरकार लाडका आरोपी योजनेत वाल्मीक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

sandeep Shirguppe

Beed Massajog Santosh Deshmukh : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने पुणे सीआयडीकडे मंगळवारी(ता. ३१) शरणागती पत्करली. यानंतर कराडला बीड येथील केज न्यायालयात हजर केल्यानंतर १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र, कराड राहत असलेल्या पोलीस कोठडीत अचानक ५ नवीन पलंग आल्याने विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

राज्याचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कराडला दिलेल्या सुविधेबद्दल सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी 'एक्स' वर दिलेल्या माहितीनुसार, 'महायुती सरकार लाडका आरोपी योजनेत वाल्मीक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का? वाल्मीक कराड पोलीस कोठडीमध्ये असताना पाच पलांगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटात ही नसतात. आरोपीचे लाड पुरण्याची ही सुरुवात आहे, हळूहळू टीव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेलमधील जेवण सगळच मिळेल'! अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

वडेट्टीवर पुढे म्हणाले, 'वाल्मीक कराडवर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने कराडवर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी. कराडवर अजूनही संतोष देशमुख हत्या असो की मोक्का अंतर्गत गुन्हा ही दाखल झालेला नाही, त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे!' असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.

रोहित पवारांनी 'एक्स'वर एक पोस्ट केली आहे. 'बीड पोलीस ठाण्यामध्ये नवीन ५ पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत. नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा.'

रोहित पवारांनी या पोस्टमध्ये कोणाचंही नाव लिहिलं नसलं तरी त्यांनी एकंदरीत हा पलंग आरोपीसाठी आणला नाही ना? असा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा बीड पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

पोलिसांकडून खुलासा

कराड यांना बीड पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आल्यानंतर तातडीने पोलीस ठाण्यात पाच नवीन पलंगांची व्यवस्था करण्यात आली. या पलंगांची व्यवस्था आरोपींसाठी करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी ही व्यवस्था स्वतःसाठी असल्याचे स्पष्ट केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement Stop: कापूस संकटात; सीसीआयची  खरेदी आजपासून बंद, मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतरही मुदतवाढ नाही

Single Women Survey: मराठवाड्यात ग्रामपंचायतस्तरावर ४.९३ लाख एकल महिलांची नोंद

Delhi Excise Policy Case : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल, सिसोदिया निर्दोष, अश्रू अनावर

Warehouse Receipt: बुर्किना फासो गोदाम पावतीवर व्यवहार

Water Conservation: वृक्षारोपण, जलसंवर्धनाचा प्रोत्साहक योद्धा

SCROLL FOR NEXT