Pocra Project Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Industry : पोकरातून रेशीम उद्योगाला ५ कोटी ८६ लाखांचे अर्थसाहाय्य

Agriculture Department Update : रेशीम उद्योगातील लाभार्थ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा च्या माध्यमातून ५ कोटी ८६ लाख ११ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली.

Team Agrowon

Latur News : मराठवाड्यातील लातूर कृषी विभागांतर्गत ५ जिल्ह्यातील ९५९ रेशीम उद्योगातील लाभार्थ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा च्या माध्यमातून ५ कोटी ८६ लाख ११ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली.

रेशीम उद्योग मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरला आहे. या उद्योगाने मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविले आहे. शेतकऱ्यांचा कल लक्षात घेऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकराच्या माध्यमातून रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांसह या उद्योगाशी संबंधित प्रक्रिया उद्योग उभारणाऱ्यांना अर्थसाहाय्य देण्याची भूमिका घेण्यात आली.

त्यानुसार लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यातील ९५९ लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य देण्यात आले. या लाभार्थ्यांमध्ये लातूरमधील २६४, धाराशिव मधील ४५१, नांदेड मधील ८३ तर परभणी- हिंगोलीतील १६१ लाभार्थ्यांचा समावेश आहे.

लातूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना १ कोटी १६ लाख ५३ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले असून धाराशिव मधील लाभार्थ्यांना २ कोटी ८३ लाख ३८ हजार रुपये, नांदेड मधील लाभार्थ्यांना ४६ लाख ८१ हजार रुपये तर हिंगोली- परभणीतील लाभार्थ्यांना १ कोटी ३९ लाख ३९ हजार रुपयाचे अर्थसाहाय्य देण्यात आल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आली. एप्रिल २०२३ पासून नोंदणी बंद असल्याचेही कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT