Minister Dr. Ashok Uike Agrowon
ॲग्रो विशेष

Tribal Village Development: कृती आराखड्याद्वारे राज्यातील ४९६५ गावे स्वयंपूर्ण करणार : मंत्री उईके

Minister Dr. Ashok Uike: राज्यातील ४९६५ आदिवासी गावे कृती आराखड्याद्वारे स्वयंपूर्ण करण्यासाठी ‘धरती आबा जनजातीय उत्कर्ष अभियान’ची अंमलबजावणी सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील ९९ गावे यामध्ये समाविष्ट असून, ९ विभागांची एकत्रित योजनांद्वारे विकास आराखडा तयार होत असल्याची माहिती मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

Team Agrowon

Pune News: धरती आबा जनजातीय उत्कर्ष अभियानांतर्गत राज्यातील ४९६५ गावांचा समावेश केला असून, त्यामधील पुणे जिल्ह्यातील ९९ गावे आहेत. या गावांच्या विकासासाठी कृती आराखडा करण्याचे काम सुरू आहे. या विकास आराखड्यांद्वारे आदिवासी गावे स्वंयपूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक ऊईके यांनी शनिवारी (ता.२८) पत्रकार परिषदेमध्ये दिली.

पुणे जिल्ह्याच्या आदिवासी विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीनंतर मंत्री डॉ. उईके यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की पुणे जिल्ह्यातील पेसाअंतर्गत ९९ गावांच्या विकास आराखडा करण्याचे काम सुरू आहे. हा विकास आराखडा करताना, विविध ९ विभागांच्या योजनांचे एकत्रीकरण करण्यात येत आहे.

यामध्ये प्रामुख्याने ऊर्जा, दूरसंचार, आरोग्य, कुटुंब कल्याण, शालेय शिक्षण, महिला बालविकास, पाणीपुरवठा स्वच्छता, ग्रामविकास, कौशल्य व उद्योजकता विकास या विभागांचा समावेश आहे. या विभागांच्या सामूहिक व वैयक्तिक लाभांच्या योजनांचा समावेश आहे.’’

‘लाडक्या बहिणीं’साठी ‘आदिवासी’चा निधी वळविला नाही

लाडक्या बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळविला नसल्याचे मंत्री डॉ. उईके यांनी सांगितले. तर २०२४-२५ या वर्षांच्या १८ हजार कोटींची आदिवासी विभागाची तरतूद या अर्थसंकल्पात २१ हजार कोटी एवढी केली आहे. यामुळे निधी दरवर्षी वाढत आहे. कोणताही निधी वळविण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

‘माझे शिक्षण मातृभाषेत मी मराठीत बोलणार’

पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच मंत्री डॉ. उईके यांनी ‘मला हिंदी येत नाही. त्यामुळे मी मराठीच बोलणार आहे,’ असे स्पष्ट करत, ‘माझी आई निरक्षर होती. मात्र माझ्या आईने मला मातृभाषेत शिकवण दिली. त्यामुळे माझे मराठी चांगले आहे,’ असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Legislative Council Voter Turnout: विधान परिषदेसाठी विक्रमी मतदान

Water Dam Water Level: वीर धरणात केवळ १८ टक्के साठा

Indrayani River Pollution: इंद्रायणी स्वच्छतेच्या प्रतीक्षेत

Pune APMC: पुणे बाजार समितीकडून ‘यशवंत’ची जमीन खरेदी पूर्ण

Solar Energy Projects: शेतकरी उत्पादक कंपन्यांचा ओढा सौरऊर्जा प्रकल्पांकडे

SCROLL FOR NEXT