Women Spinning Mill Election Agrowon
ॲग्रो विशेष

Women Spinning Mill Election : सांगोल्याच्या महिला शेतकरी सूतगिरणी निवडणुकीत ४८ अर्ज

Election Update : सांगोल्यातील शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणुक प्रक्रिया सुरू झाली आहे.

Team Agrowon

Solapur News : सांगोल्यातील शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणुक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर २१ जागांसाठी ४८ अर्ज दाखल झाले आहेत. सहकारी संस्था मतदारसंघात एकच अर्ज दाखल झाल्याने या जागेची निवडणूक मात्र बिनविरोध झाली.

शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण संचालक पदाच्या २१ जागेसाठी तब्बल ४८ अर्ज दाखल झाले असल्याने निवडणूक बिनविरोध होणार का, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. सूतगिरणीच्या २ हजार ३५६ सभासदांपैकी कापूस उत्पादक गटात १ हजार ६२९, बिगर कापूस उत्पादक गटात ७२१ व संस्था प्रतिनिधी मतदार संख्या ६ आहे.

स्थापनेपासूनच शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूत गिरणीची निवडणूक बिनविरोध होत आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत सूतगिरणीच्या निवडणुकीत तब्बल ४८ अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत रंगत येण्याची चिन्हे दिसत आहेत. आतापर्यंत महिला सूत गिरणीवर शेतकरी कामगार पक्षाची एकहाती सत्ता आहे. यंदा मात्र, सूत गिरणीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शेकापला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

२४ हजार सभासदांची नावे वगळली

शेअर्सची रक्कम अपूर्ण असल्याचा ठपका ठेवत शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूत गिरणीच्या तब्बल २४ हजार सभासदांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याने सभासदांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मतदार यादीतून नावे वगळण्यात आल्याने २४ हजार सभासदांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे सूत गिरणीची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार, याकडे संपूर्ण सांगोला तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मतदारसंघनिहाय दाखल झालेले अर्ज

सूतगिरणीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कापूस उत्पादक शेतकरी मतदारसंघातून ११ जागेसाठी २७ अर्ज, बिगर कापूस उत्पादक शेतकरी मतदारसंघातून ५ जागेसाठी १० अर्ज, संस्था मतदारसंघातून १ जागेसाठी १ अर्ज,

अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ २ जागेसाठी ४ अर्ज, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघ १ जागेसाठी ४ अर्ज, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी १ जागेसाठी १ अर्ज अशा एकूण २२ जागेसाठी ४८ अर्ज दाखल झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT