Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : सातारा जिल्ह्यात रब्बी पीककर्जाचे ४६ टक्के वाटप

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ८४५ कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Team Agrowon

Satara Crop Loan News : जिल्ह्यात रब्बी हंगामातील कर्जवाटप सुरू होऊन चार महिने उलटले आहेत. या चारा महिन्यांत जिल्ह्यातील बँकांनी ४६ टक्के पीककर्जाचे वितरण केले आहे. यामध्ये जिल्हा बॅंकेने जिल्हा बँकेने १८८ कोटी तीन लाख रुपये, म्हणजेच ४१ टक्के वितरण करण्यात आले.

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी (Rabbi Season) ८४५ कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी ३१ जानेवारीअखेर ३६ हजार ७४८ शेतकऱ्यांना ३८५ कोटी ७० लाख रुपये कर्जाचे वितरण केले आहे. गेल्या चार महिन्यांत अवघे ४६ टक्के कर्ज वितरण झाले.

खरीप हंगामात उद्दिष्टांच्या ८४ टक्के बँकांनी कर्जवाटप केले होते. या कर्जवाटपात जिल्हा बँकेचा सर्वाधिक वाटा आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी या हंगामात कर्जवाटपात उद्दिष्टाच्या ५९ टक्के वितरण केले होते.

मात्र रब्बी हंगामात या बँकांनी काही प्रमाणात कर्जवाटपात सुधारणा केली आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांचे ३९१ कोटी उद्दिष्ट असून, यापैकी १९७ कोटी ६७ लाख रुपयांचे कर्जकर्ज वितरण केले आहे. त्यांचे ५१ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेस ४५४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी या बँकेने १८८ कोटी तीन लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. जिल्हा बॅंकेने एकूण उद्दिष्टापैकी ४१ टक्के कर्जाचे वितरण केले.

रब्बी कर्ज वितरण सुरू होऊन चार महिने उलटले. कर्ज वितरणाची मार्चअखेरपर्यंत मुदत आहे. उर्वरित कालवधीत किती कर्जवाटप होईल, हे पाहावे लागेल. शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, पूर तसेच यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT