Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : परभणीत पाऊस, गारपिटीने ४४० हेक्टर पिकांचे नुकसान

Crop Damage Update : परभणी जिल्ह्यात मंगळवार (ता. ९) ते बुधवार (ता. २४) या कालावधीत अवकाळी पाऊस, गारपीट झाली. यामुळे सहा तालुक्यांतील ६० गावांतील ७८२ शेतकऱ्यांच्या ४४०.३१ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे,

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात मंगळवार (ता. ९) ते बुधवार (ता. २४) या कालावधीत अवकाळी पाऊस, गारपीट झाली. यामुळे सहा तालुक्यांतील ६० गावांतील ७८२ शेतकऱ्यांच्या ४४०.३१ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात वादळी पाऊस सुरूच आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामेदेखील सुरू आहेत. परभणी, सेलू, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा तालुक्यांतील ६० गावांना मोठा फटका बसला आहे. त्यात परभणी व पूर्णा तालुक्यांतील १०१ हेक्टर जिरायती पिके, परभणी, सेलू, सोनपेठ, गंगाखेड तालुक्यांतील २११.७ हेक्टरवरील बागायती पिके, तर परभणी, सेलू, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णातील १२७.६१ हेक्टर फळबागांचा समावेश आहे.

परभणी, जिंतूर, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा तालुक्यांतील २२ गावांत जीवितहानी झाली आहे. त्यात सोनपेठ व गंगाखेडमधील प्रत्येकी १ व्यक्तींचा मृत्यू झाला, तर २ व्यक्ती जखमी झाल्या. लहान ३ व मोठी १३ जनावरे, ७ बैल मिळून एकूण २३ जनावरे दगावली आहेत.

नुकसानीची स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका बाधित

गावे बाधित शेतकरी बाधित क्षेत्र

परभणी ९ ६४५ ३१४

सेलू ४ ३२ २२

पाथरी ७ ८ ६५

सोनपेठ २६ ३३ १९

गंगाखेड ९ ४२ १३

पूर्णा ५ ३ ४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT