MAGNET Project Agrowon
ॲग्रो विशेष

MAGNET Project : ‘मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत ४२.२१ कोटींचे अनुदान वितरित

Vegetable Export : एकूण १४१.२१ कोटी मंजूर; प्रकल्प संचालक विनायक कोकरे यांची माहिती

Team Agrowon

Pune News : राज्यातील फळे आणि भाजीपाल्याच्या प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि निर्यातीसाठीच्या ‘मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत ५४ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पांसाठी १४१ कोटी २४ लाख रुपयांचे अनुदान मंजूर आहे. तर ४२ कोटी २१ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. तर १४७ प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल असल्याची माहिती ‘मॅग्नेट’चे प्रकल्प संचालक विनायक कोकरे यांनी दिली.

या प्रकल्पाबाबत माहिती देताना कोकरे म्हणाले, की राज्यातील कृषी हवामान विभागानुसार १२ फळपिके आणि फुलांच्या मूल्यवर्धन आणि प्रक्रियेसाठी जागतिक बँकेच्या अर्थसाह्यातून महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पासाठी ३७९ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, यापैकी १४१ कोटी २४ लाख रुपये निधी ५४ प्रकल्पांसाठी मंजूर झाले आहेत. यापैकी ४२ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. ५४ प्रकल्पांपैकी १ प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असून, ११ प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. तर ४२ प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहेत.

१४७ प्रस्ताव मंजुरीसाठी प्राप्त
डाळिंब - २०, केळी -१३, संत्रा ५, पेरू १६, सीताफळ १५, मोसंबी १०, चिकू ९, स्ट्रॉबेरी ४, भेंडी १७, मिरची २९, आंबा ३, लिंबू २ फुले -३.

२०२४-२५ साठी ९० कोटींचा निधी मंजूर
२०२४-२५ या वर्षासाठी २६० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद असून, यापैकी ९० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याचे उपप्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT