Warana Milk agrowon
ॲग्रो विशेष

Warana Milk : म्हैस खरेदीसाठी ४२ हजारांचे अनुदान, वारणा दूध संघाचा निर्णय

Warana Milk Rate : वारणा दूध संघातर्फे परराज्यातून मेहसाना व मुऱ्हा म्हशी खरेदी करून संघाच्या कार्यस्थळावर सुमारे ५०० म्हशींचे विक्रीचे केंद्र निर्माण केले जाईल.

sandeep Shirguppe

Warana Dudh Sangh Kolhapur : वारणा दूध संघातर्फे परराज्यातून मेहसाना व मुऱ्हा म्हशी खरेदी करून संघाच्या कार्यस्थळावर सुमारे ५०० म्हशींचे विक्रीचे केंद्र निर्माण केले जाईल. या केंद्रातील म्हैस खरेदी करणाऱ्या दूध उत्पादकांना ४२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा संघाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी केली. तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या ५६ व्या वार्षिक सभेत डॉ. कोरे काल गुरूवार (ता.२६) बोलत होते.

डॉ. कोरे म्हणाले, ‘दूध संस्थाच्या कमिशनमध्ये प्रतिलिटर ४० पैशांची वाढ केली आहे. सहकारी तत्त्वावरील संस्था मोडीत काढण्यासाठी बाहेरील कंपन्या जादा दराचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना फसविण्याचा कुटील डाव करत आहेत व इतर कंपन्या निकृष्ट दर्जाचे पशुखाद्य वापरत असल्याने तात्पुरती दूध वाढ होत असली तरी ते खाद्य जनावरांवर अनिष्ट परिणाम करत असल्याची माहिती डॉ. कोरे यांनी दिली.

'मुंबई येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात दूधपुरवठा करण्याचे टेंडर मिळाले आहे. पुढील वर्षी पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय सुरू होईल. अशीही माहिती आमदार कोरे यांनी दिली.’

कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत केले. वारणा विद्यापीठास मंजुरी मिळाल्याबद्दल डॉ. कोरे यांचा सत्कार झाला. अरुण कुंभार, रंजना माने यांनी सहकारगीत सादर केले. उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रताप पाटील, वारणा बँकेचे संचालक प्रमोद कोरे उपस्थित होते.

कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी विषयवाचन व अहवालवाचन केले. शीतल बसरे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक शिवाजी कापरे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT