Sangli APMC Election News Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Apmc Election : सांगली बाजार समितीसाठी शेवटच्या दिवशी ४१३ अर्ज

सांगलीसह जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी मार्चच्या अखेरीस निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सांगली बाजार समितीसाठी २८ एप्रिलला मतदान होणार आहे.

Team Agrowon

Sangli Apmc Election Update : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Sangli Agriculture Produce Market Committee) पंचवार्षिक निवडणुकीसाठी विक्रमी ५९८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ४१३ जणांनी अर्ज भरले.

नेत्यांचे पुत्र, नातेवाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे चित्र आहे. उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी (ता. ५) होणार आहे.

सांगलीसह जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी मार्चच्या अखेरीस निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सांगली बाजार समितीसाठी २८ एप्रिलला मतदान होणार आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सोसायटी गट सर्वसाधारण गटामधून २१३, सोसायटी गट महिला राखीव ५०, सोसायटी गट नागरिकांचा मागास प्रवर्ग ४८, सोसायटी गट भ. वि. जा. अ. ५२, ग्रामपंचायत गट सर्वसाधारण १२३,

ग्रामपंचायत अनु. जाती व जमाती ३०, ग्रामपंचायत आर्थिकदृष्टया दुर्बल गट ३१, अडते व व्यापारी गट ३४ व हमाल तोलाईदार गटातून १७ अर्ज दाखल झाले. बाजार समितीच्या इतिहासात सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

बाजार समितीनिहाय दाखल अर्जांची संख्या

तासगाव बाजार समिती - १६८

आटपाडी बाजार समिती -१६७

इस्लामपूर समिती - ९६

शिराळा समिती - ५९

पलूस समिती - १४२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT