Amit Shah Agrowon
ॲग्रो विशेष

Amit Shah Ethanol : मोदी सरकारच्या इथेनॉल धोरणामुळे ४० हजार कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खिशातः अमित शाह

मोदी सरकारने इथेनॉलच्या बाबतीत घेतलेल्या विविध धोरणात्मक निर्णयांमुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना मोठा फायदा झाल्याचे शाह यांनी स्पष्ट केले.

Team Agrowon

Amit Shah news : ‘‘इंधनामध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट साध्य झाल्यामुळे ४१ हजार ५०० कोटी रूपयांचे परकीय चलन वाचले.

त्यातील ४० हजार ६०० कोटी रूपये थेट शेतकऱ्यांच्या खिशात गेले. तसेच कार्बन उत्सर्जनात प्रचंड घट झाली. इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट २०२५ पर्यंत दुप्पट करून २० टक्क्यावर नेले जाईल,'' असे केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगितले.  

सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय सहकार महापरिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते शनिवारी (ता. १९) बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,  ‘सकाळ'चे अध्यक्ष प्रताप पवार, ‘सकाळ'चे संपादक संचालक श्रीराम पवार, मुंबई बॅँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर उपस्थित होते.

मोदी सरकारने इथेनॉलच्या बाबतीत घेतलेल्या विविध धोरणात्मक निर्णयांमुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना मोठा फायदा झाल्याचे शाह यांनी स्पष्ट केले.

तसेच साखर कारखान्यांचा प्राप्तिकर रद्द करण्याच्या निर्णयामुळे गेली अनेक वर्षे रखडलेली समस्या दूर झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. हा प्राप्तिकर पूर्वलक्ष्यी प्रभावाने रद्द करण्यात आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

सहकार क्षेत्रात देशात महाराष्ट्र आघाडीवर असला तरी या क्षेत्रातील गैरप्रकारांबद्दल आत्मचिंतन केले पाहिजे, अशा शब्दांत शाह यांनी सहकार क्षेत्रातील धुरिणांचे कान टोचले.

सहकारी साखर कारखान्यांची संख्या २०२ वरून घटून १०१ झाली आहे, तर खासगी कारखाने २२ वरून ९३ वर पोहोचले आहेत. ही वेळ कशामुळे आली, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे.

अनेक जिल्हा बॅंका आणि नागरी सहकारी बॅंका डबघाईला आल्या आहेत. सहकारी चळवळीपुढे विश्वासार्हता  कायम ठेवण्याचे आव्हान आहे, असे शाह यांनी बोलून दाखवले.    

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT