Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Bill : लातूरकरांनी भरले थकित वीजबिलाचे ४० कोटी

Abhay Yojana : लातूर, धाराशिव व बीड जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लातूर परिमंडलात अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Team Agrowon

Latur News : थकबाकीअभावी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील लघुदाब आणि उच्चदाब वर्गवारीतील वीजग्राहकांसाठी ‘महावितरण’ने सुरू केलेल्या अभय योजनेचा लाभ घेण्यात धाराशिव व बीड जिल्ह्यांपेक्षा लातूरमधील थकबाकीदार ग्राहक पुढे आहेत.

या योजनेचा लातूरमधील ३३८ वीजग्राहकांनी लाभ घेतला. विशेष म्हणजे ३२८ वीजग्राहकांनी एकरकमी ४० कोटी ३३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे त्यांना ७ कोटी ७४ लाख रुपयांची सूट मिळाली आहे.

लातूर, धाराशिव व बीड जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लातूर परिमंडलात अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १२ दिवसांच्या कालावधीत लातूर परिमंडलातील तीनही जिल्ह्यातील ६३१ ग्राहकांनी १०१ कोटी ९६ लाख रुपयांचा भरणा करून योजनेत सहभाग नोंदविला आहे.

या योजनेमुळे त्यांना २९ कोटी ४७ लाख रुपयांचे व्याज आणि विलंब आकार माफ झाला असून एकरकमी बिल भरल्यामुळे अतिरिक्त ८ कोटी २९ लाखांची सूट मिळाली आहे. यातील ४० वीजग्राहकांनी ३० टक्के रक्कम भरून सहा हप्त्याने थकीत रक्कम भरण्याचा पर्याय स्वीकारला आहे. लातूर जिल्ह्यातील ३३८ वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला असून ३२८ वीजग्राहकांनी एकरकमी ४० कोटी ३३ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

तर धाराशिव जिल्ह्यातील १२३ वीजग्राहकांनी लाभ घेतला असून १०२ वीजग्राहकांनी एकरकमी १५ कोटी ३६ लाख रुपयांचा भरणा केल्यामुळे त्यांना ४ कोटी ९५ लाख रुपयांची सूट मिळाली आहे. बीड जिल्ह्यातील १७० वीजग्राहकांनी लाभ घेतला असून १६१ वीजग्राहकांनी एकरकमी २७ कोटी २४ लाख रुपयांचा भरणा केल्यामुळे त्यांना १२ कोटी ५३ लाख रुपयांची सूट मिळाली आहे.

लातूर परिमंडलातील ६३१ वीजग्राहकांनी १०१ कोटी ९६ लाख रक्कम भरून लाभ घेतला आहे. यांपैकी ५९१ थकबाकीदारांनी ८२ कोटी ९३ लाख रुपये एकरकमी थकबाकी जमा केल्यामुळे त्यांना अतिरिक्त १० टक्क्यासह तब्बल ३३ कोटी ५२ लाख रुपयांची व्याज व विलंब आकाराची सूट मिळाली आहे.

...अशी आहे योजना

कृषी व सार्वजनिक पुरवठा योजना वर्गवारीतील ग्राहक वगळून ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या सर्व लघुदाब आणि उच्चदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे. योजनेत थकबाकीमुक्त होणाऱ्या खंडित ग्राहकांना नवीन वीज जोडणीची संधी देणारी ही योजना आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT