Well  Agrowon
ॲग्रो विशेष

Well Subsidy : विविध सिंचन विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान

Irrigation Subsidy Scheme : विविध सिंचन विहीर योजनेंतर्गत निकषित लाभार्थ्यांना पूर्वी प्रती अडीच लाखांचे अनुदाय देय होते. त्यात आता वाढ झाली असून प्रती लाभार्थी चार लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

Team Agrowon

Dhule News : विविध सिंचन विहीर योजनेंतर्गत निकषित लाभार्थ्यांना पूर्वी प्रती अडीच लाखांचे अनुदाय देय होते. त्यात आता वाढ झाली असून प्रती लाभार्थी चार लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते यांनी केले. तसेच पशुगणनेत पशुपालकांनी अचूक माहिती द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषदेत कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीची बैठक झाली. सभापती हर्षवर्धन दहिते अध्यक्षस्थानी होते. समिती सदस्य संग्राम पाटील, विजय ठाकरे, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अशोक वाडिले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संदीप निकम, जिल्हा कृषी विकास अधिकारी सिताराम चौधरी, मोहीम अधिकारी पी. व्ही. निकम, कृषी अधिकारी कावेरी राजपूत, समितीचे अन्य सदस्य, तालुकास्तरावरील कृषी अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पशुगणना सुरू

जिल्ह्यासह राज्यात २१ वी पशुगणना सुरू झाली आहे. यात पशुगणनेसाठी जिल्ह्यात १५० प्रगणक व ३४ पर्यवेक्षक कार्यरत आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत पशुगणना पूर्ण होणार आहे. पशुगणना ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंबातून होत आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून पशुगणना केली जाणार आहे.

नागरी व ग्रामीण भागातील विविध प्रजातींची जातिनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय, उपयोगानुसार आकडेवारी संकलित केली जाणार आहे. भटकी कुत्री, गायी आणि प्रथमच भटका पशुपालक समुदाय, गोशाळा, पांझरापोळ येथील गोवंशाचीदेखील माहिती संकलित केली जाणार आहे.

लाभाचे वाटप होणार

पशुगणनेमुळे दूध, अंडी, मांस, लोकर आदी उत्पादनाचा अंदाज करणे, लसीकरण कार्यक्रम राबविणे, विविध योजना राबविणे, लोकसंख्येच्या आधारीत निधी देणे, पायाभूत सुविधा आणि सेवा यासारख्या संसाधनाचे वाटप करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांनी आपल्या पशुधनाची अचूक माहिती आपल्याकडे येणाऱ्या संबंधित प्रगणक, पशुधन पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहन सभापती दहिते यांनी केले.

विहीर अनुदानात वाढ

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसामुंडा सिंचन विहीर योजनेत अनुसूचित जाती, जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना यापूर्वी अडीच लाख रुपये अनुदान देय होते. त्यात आता शासनाने वाढ केली असून अनुदानाची रक्कम चार लाख रुपये झाली आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमातीच्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी सिंचन विहिरीसाठी संबंधित पंचायत समितीकडे अर्ज करावे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वीज महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर अर्ज करावे. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती दहिते यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Loan Concessions: उद्योगपतींप्रमाणे हव्यात शेतकऱ्यांना सवलती: शरद पवार

Farmer ID Registration Challenges: चाळीस टक्के पीकक्षेत्र अद्याप फार्मर आयडीविना; ॲग्रीस्टॅकच्या अंमलबजावणीत राज्यांसमोर नोंदणीचे आव्हान

Farm Loan Waiver Scheme: कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता जमा

Cooperative Sugar Mills Loan: सहकारी कारखान्यांना सवलतीने कर्ज शक्य; ‘सहकार’चा वित्त विभागाकडे प्रस्ताव

Maharashtra Monsoon Prediction: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT