Majhi Vasundhara  Agrowon
ॲग्रो विशेष

Majhi Vasundhara : दहा ग्रांमपंचायतींना ‘माझी वसुंधरा’मधून ४ कोटींची बक्षिसे

Gram Panchayat : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’अंतर्गत उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थासाठीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

Team Agrowon

Nagar News : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’अंतर्गत उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थासाठीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

बक्षिसांमध्ये तालुक्यातील दहा ग्रांमपंचायतीने चार कोटी रुपयांचे बक्षीस प्राप्त करत राज्यात विक्रम प्रस्थापित केला. संगमनेरचा माझी वसुंधरा राज्याला दिशादर्शक ठरला आहे, तर एकाच तालुक्याला मिळालेली ही सर्वाधिक बक्षीस संख्या आहे.

राज्य सरकारच्या वतीने पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान ४.० हे एक एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीकरिता राबवण्यात आले. या अभियानात राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था आणि २२ हजार २१८ ग्रामपंचायती अशा एकूण २२ हजार ६३२ संस्थांनी सहभाग नोंदवला होता.

त्रयस्थ यंत्रणेमार्फत मूल्यांकन करण्यात आल्यानंतर शासनाने बक्षिसे जाहीर केली आहेत. दहा हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गटात घुलेवाडी ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून, दीड कोटी रुपयांचे बक्षीस प्राप्त होणार आहे.

भूमी थीमटीकमध्ये घुलेवाडी ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवत ७५ लाखांचे बक्षीस प्राप्त केले आहे. नाशिक विभाग स्तरावरील गुंजाळवाडी ग्रामपंचातीला दहावा गुणानुक्रम प्राप्त झाला आहे. त्याकरिता पंधरा लाखांचे बक्षीस प्राप्त होणार आहे. पाच ते दहा हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत विभाग स्तरावर धांदरफळ बुद्रुक ग्रामपंचायतीने गुणानुक्रमांक पंधरा मिळवत पंधरा लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त केले आहे.

अडीच हजार ते पाच हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीत राज्यस्तर उत्तेजनार्थ पारितोषक खांडगाव ग्रामपंचायतीस जाहीर झाले असून, त्याकरिता पंधरा लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. नाशिक विभागात पेमगिरी व चिंचोली गुरव ग्रामपंचायतीना पंधरा लाखांची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

१.५ हजार ते २.५ लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीमध्ये लोहारे ग्रामपंचायतीने विभाग स्तरावर क्रमांक प्राप्त करत पंधरा लाखांची बक्षिसे प्राप्त केली. ग्रामपंचायतीत विभाग स्तरावर चौरकोठे ग्रामपंचायतीने क्रमांक प्राप्त करत पंधरा लाखांचे बक्षीस मिळवले. तिगाव ग्रामपंचायतीने राज्यस्तरावरील ५० लाख रुपयांचे तिसरे बक्षीस प्राप्त केले आहे, तर संगमनेर नगर परिषदेला राज्य स्तरावर उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

Marigold Farming: तीन हंगामांत झेंडूचे हुशारीने नियोजन

Agriculture Success Story: कुक्कुटपालन पूरक नव्हे, झाला मुख्य व्यवसाय

Sugarcane Farmer Issues: कष्ट शेतकऱ्यांचे, नफा इतरांचा

India Sugar Crisis: आकडे आणि नामुष्की

SCROLL FOR NEXT