Irrigation Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation Scheme : परभणी जिल्ह्यातील लाभार्थींना ३८ लाखांवर अनुदान वितरित

CM Sustainable Agriculture Irrigation Scheme : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनाअंतर्गंत परभणी जिल्ह्यात डिसेंबरअखेर ५६ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून, लाभार्थी शेतकऱ्यांना ३८ लाख १० हजार १६३ रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.

Team Agrowon

Parbhani News : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनाअंतर्गंत परभणी जिल्ह्यात ४२० वैयक्तिक शेततळ्याचे उद्दिष्ट आहे. डिसेंबरअखेर ५६ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून, लाभार्थी शेतकऱ्यांना ३८ लाख १० हजार १६३ रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.

कृषी विभागा मार्फत राज्यात नोव्हेंबर २०२२ पासून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन येोजना राबविली जात आहे. दुष्काळी स्थितीत शेततळ्यातील पाणी उपयोगी येते. या योजनेअंतर्गंत अस्तरीकरणाशिवाय शेततळ्यासाठी ७५ हजार रुपये, तर अस्तरीकरणासह शेततळ्यासाठी १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान आहे.

जिल्हास्तरावर काम पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते. यापूर्वी शेततळे योजनेचा लाभ न घेतल्यांनी महाडीबीटी पोर्टलवर सीएससी केंद्रामार्फत किंवा वैयक्तिकरित्या ऑनलाइन नोंद करून योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी कृषी साहाय्यक, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवी हरणे यांनी केले आहे.

जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये या योजनेच्या लाभासाठी सोडतीद्वारे २८७ शेतकऱ्यांच्या अर्जाची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ८ अर्ज नाकारण्यात आले तर २६७ अर्ज रद्द करण्यात आले. एकूण १२ शेतकऱ्यांनी शेततळे पूर्ण केले असून त्यांना ६ लाख ७१ हजार ३४८ रुपये अनुदान वितरित करण्यात आले. २०२३-२४ मध्ये या अंतर्गंत सोडतीद्वारे ३ हजार ८३ शेतकऱ्यांच्या अर्जाची निवड करण्यात आली होती.

३८ अर्ज नाकारण्यात आले, तर २ हजार ४३६ अर्ज रद्द करण्यात आले. ६०७ अर्ज प्रक्रियेत आहेत. शेततळे पूर्ण केलेल्या ४६ शेतकऱ्यांना अनुदान वितरणास मंजुरी देण्यात आली. एकूण ४४ शेतकऱ्यांना ३१ लाख ३८ हजार ८१५ रुपये अनुदान वितरित करण्यात आले.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना शेततळे अनुदान वाटप स्थिती

तालुका लाभार्थी 

संख्या अनुदान रक्कम (लाख रुपये)

परभणी २ ०.७०

जिंतूर ४ १.६२

सेलू ६ ४.५२

मानवत ५ ३.८९

पाथरी २ १.७५

सोनपेठ ३ १.९२

गंगाखेड ११ ७.०१

पालम २५ १५.४२

पूर्णा .१ ०.७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT