Women Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Women Farmer : ओडीशा सरकारची शेतकरी महिलांसाठी ३६७ कोटीची तरतूद

Team Agrowon

शेतीच्या उगमापासून शेती क्षेत्रात महिलांची (Farmer Women) भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरण (Women Empowerment) कुटुंब ते शेती अशा सर्वच स्तरावर महत्त्वाचे आहे, त्यातून महिलांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी धोरणांच्या दृष्टीने अधिक महत्त्वपूर्ण अशी पावले उचले गरजेचे आहे. ओडीशा राज्य सरकारने शेती क्षेत्रातील महिलासाठी ३६७ कोटींची तरतूद केली आहे. मंगळवारी (ता.२७) मुख्यमंत्री नवीन पटनाईक (Navin Patnaik) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ओडीशा सरकारने दिलेल्या माहितीनुसार, "राज्यातील शेती क्षेत्रातील महिलांना सक्षम करण्यासाठी आणि राज्यातील मशरूम उत्पादनात दुप्पटीने वाढ करण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. तसेच फूल शेतीलाही प्रोत्साहन या योजनेतून देण्यात येणार आहे." ओडीशामध्ये मशरूमचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मशरूम शेतीत महिलांची कामे अधिक असतात. त्यामुळे ओडीशा सरकारने ही तरतूद केली आहे.

राज्यातील महिलांना शाश्वत रोजगार मिळावा. त्यामुळे त्यातून महिला आत्मनिर्भर बनतील. तसेच महिलांनी उत्पादित केलेल्या बटन मशरूम आणि फुलांची निर्यातही करण्यात येणार असल्याचा निर्णय ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या सरकारने घेतला आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सक्रिय सहभागाने आणि महिला गटांच्या मदतीने बटाटा, भाजीपाला आणि मसाले पिकांच्या विकासावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी ११४२.२४ कोटीची तरतूद पुढील चार वर्षांसाठी करण्यात आली आहे, अशीही माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली.

बटाटा, कांदा, टोमॅटो, आणि फुलकोबी या भाजीपाला पिकांच्या उत्पादनात राज्याला आत्मनिर्भर करायचे आहे. त्यासाठी या पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या योजनेमुळे ग्रामीण भागांमध्ये रोजगार निर्मिती होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. तसेच बटाटा, कांदा आणि मसाल्यांच्या पिकांवरील अवलंबित्व कमी होईल, अशी ओडीशा राज्य सरकारला आशा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Silk And Milk Project : परभणी जिल्ह्यातील ९ गावांमध्ये सिल्क आणि मिल्क प्रकल्प

Paddy Crop Damage : पावसामुळे तळामध्ये भात जमीनदोस्त

Ration Grain : रेशन धान्य वाटपात सोलापूर राज्यात प्रथम

Orchard Cultivation : जलकुंड आधारित फळबाग लागवड वरदान

Grape Producer : द्राक्ष बागायतदारांच्या समस्या सोडवा

SCROLL FOR NEXT