Natural Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Farming : नांदेडला साडेतीन हजार हेक्टरवर नैसर्गिक शेती

Organic Farming : राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना नांदेड जिल्ह्यात २०२४-२५ पासून राबविण्यात येत आहे. यात एक गट ५० हेक्टरचा आहे. जिल्ह्यात एकूण ७० गटांअंतर्गत जिल्ह्यात तीन हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

कृष्णा जोमेगावकर : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nanded News : नांदेड : राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना नांदेड जिल्ह्यात २०२४-२५ पासून राबविण्यात येत आहे. यात एक गट ५० हेक्टरचा आहे. जिल्ह्यात एकूण ७० गटांअंतर्गत जिल्ह्यात तीन हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली.

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची नांदेड जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी केली जात आहे. नैसर्गिक शेती ही स्थानिक पशुधन आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधनावर आधारित आणि भारतीय परंपरेत रुजलेली रसायनमुक्त शेती पद्धती आहे.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, बाह्य निविष्ठा खरेदी न करणे, निसर्गावर आधारित शाश्वत शेतीप्रणाली विकसित करणे, मातीचे आरोग्य आणि सुपीकता पुनरुज्जीवीत करणे, पाण्याची गुणवत्ता वाढविणे, जैवविविधता जतन करणे आणि शेतकरी, त्यांचे कुटुंब आणि ग्राहकांना सुरक्षित, आरोग्यदायी आणि पौष्टीक अन्न पुरविणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

नांदेड जिल्ह्यात २०२४-२५ या वर्षात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील १६ तालुक्यांत योजनेची अमलबजावणी होणार आहे. प्रत्येक तालुक्यात तीन ते चार गटांची स्थापना करण्यात येत आहे. एका गटात १२५ एकर शेती व १२५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. गटातील प्रत्येक शेतकऱ्याची निवड झाल्यानंतर त्या शेतकऱ्याची एक एकर जमीन नैसर्गिकरित्या कसण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी सांगितले.

निसर्गावर आधारित शाश्वत शेतीच्या प्रणालींना चालना देण्यासाठी शेतात निविष्ठा निर्मिती करून निविष्ठा खरेदीवरील खर्च कमी करणे, मातीचे आरोग्य सुधारणे, देशी पशुधन लोकप्रिय करण्यासाठी नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात येणार आहे.

- दत्तकुमार कळसाईत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT