Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : रब्बी आवर्तनातून तेरा दिवसांत भिजले ३५० हेक्टर क्षेत्र

Crop Irrigation : भोजापूर कालव्याला सोडण्यात आलेल्या रब्बी आवर्तनातून १३ दिवसांत ३५० हेक्टरवरील पिकांच्या सिंचनाला लाभ देण्यात आला.

Team Agrowon

Nashik News : भोजापूर कालव्याला सोडण्यात आलेल्या रब्बी आवर्तनातून १३ दिवसांत ३५० हेक्टरवरील पिकांच्या सिंचनाला लाभ देण्यात आला. हे आवर्तन अजून १५ दिवस चालणार आहे.

सिन्नर व संगमनेर तालुक्यातील २१ गावांना आवर्तनाचा लाभ होतो. १५० क्यूसेकच्या क्षमतेने कालव्याला पाणी सुरू आहे. दोडी बुद्रुक, कणकोरी, मानोरी व संगमनेर तालुक्यातील निमोण येथे पाणी वितरणाचे काम सुरू आहे. रब्बीच्या गहू, हरभरा, मका, ज्वारी यांसह फळपिकांना आवर्तनाचा लाभ देण्यात येत आहे.

सिंचनाच्या मागणीत घट

गत वर्षी दुष्काळी स्थितीत एक हजार ७०० हेक्टरवर सिंचनासाठी शेतकऱ्यांनी मागणी नोंदविली होती. यंदा पावसाळा चांगला झाल्याने मागणीत शंभर हेक्टरची घट झाली आहे. आत्तापर्यंत एक हजार ६०० हेक्टर क्षेत्राची मागणी जलसंपदा विभागाकडे आली आहे.

तेरा कर्मचाऱ्यांची गस्त

कालव्यावर १३ कर्मचाऱ्यांकडून गस्त सुरू आहे. भोजापूर कालव्याचे आवर्तन पाणी पळवापळवीमुळे यापूर्वी चर्चेत राहिले आहे. शेतकऱ्यांना नाशिक-पुणे महामार्गावर आंदोलनांची वेळही आली आहे. यंदा शेतकऱ्यांकडील पाण्याच्या उपलब्धतेमुळे कालवा फोडी व पाणी पळवापळवी अद्याप झालेली नसली तरी कर्मचारी गस्त देत आहेत.

पावसामुळे यंदा स्थिती चांगली आहे. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून प्रशासनास सहकार्य होत आहे. मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
- सुभाष पगारे, उपअभियंता, जलसंपदा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

Lemon Rate: अमरावतीत लिंबाला ६००० ते ७००० रुपये दर

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी

SCROLL FOR NEXT