Fish Conervation Agrowon
ॲग्रो विशेष

Fish Conservation : मत्स्योत्पादन, संवर्धनाची ३५ केंद्रे बंद

Fish Production : पुरेसे मनुष्यबळ, सुविधांचा अभाव तलावांची दुरुस्ती या साऱ्यांमुळे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून ६७ मत्स्योत्पादन व संवर्धन केंद्रांना घरघर लागली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : पुरेसे मनुष्यबळ, सुविधांचा अभाव तलावांची दुरुस्ती या साऱ्यांमुळे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून ६७ मत्स्योत्पादन व संवर्धन केंद्रांना घरघर लागली आहे. परिमाणी, राज्यातील ३५ मत्स्त्योत्पादन व संवर्धन केंद्रे बंद पडली आहेत. केंद्र दुरुस्ती करून सुविधा आणि मनुष्यबळ देण्याची मागणी मच्छीमार सहकारी संस्था करत आहेत. मात्र मत्स्य व्यवसाय विभागाने त्याकडे काणाडोळा केला आहे.

मच्छीमार संस्थांना सुमारे ८२ कोटी १० लाख मत्स्य बोटुकलीची आवश्यकता आहे. या संस्थांना दर्जेदार आणि कमी किमतीत मत्स्य बोटुकली (बीज) मिळावी, यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने मत्स्यबीज मत्स्योत्पादन, संवर्धन केंद्र सुरू केली आहेत.

राज्यात ३२ मत्स्योत्पादन केंद्रे, २ कोळंबी बीज उत्पादन केंद्रे, ३२ मत्स्यबीज संवर्धन केंद्रे आणि २ कोळंबी संवर्धन केंद्रे अशा एकूण ६७ केंद्रांत मत्स्य आणि कोळंबीचे संवर्धन आणि उत्पादन केले जाते. मात्र या केंद्रातून ७ कोटी १९ लाख ८५ इतकेच मत्स्यबीजाचे उत्पादन होते.

बहुतांश मत्स्य विभागाच्या मत्स्योत्पादन, संवर्धन केंद्रात वीजपुरवठा नाही. तसेच तलावाची दुरुस्ती केलेली नाही. अनेक तलावांत पुरेसे पाणी सोडण्यात येत नाही. अवर्षण भागातील तलावात पुरेसा पाणीसाठा होत नाही. त्यासाठी पाटबंधारे आणि जिल्हा परिषदेचा विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे मत्स्योत्पादन आणि संवर्धन केंद्रांना फटका बसला आहे.

प्रत्येक जिल्ह्यानुसार मत्स्योत्पादन, संवर्धन केंद्रांत पदे निर्माण केली आहेत. त्यानुसार पद भरती केली जाते. सहायक आयुक्त या केंद्राचा कारभार पाहतात. केंद्राच्या ठिकाणी मत्स्य क्षेत्रक, लिपिक, शिपाई अशी विविध पदे आहेत.

मात्र, अनेक केंद्रात ही पदेही रिक्त आहेत. त्यामुळे केंद्रे बंद ठेवावी लागली आहेत. संस्थांना दर्जेदार बीज मिळत नाहीत. परिणामी, ६७ पैकी ३५ केंद्रे बंद पडली आहेत. सुरू असलेल्या केंद्रांतून आवश्यक बीज उत्पादन होऊ शकत नसल्याने पुरवठा करणे कठीण बनले आहे. सर्व केंद्रे सुरू करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.

विभागनिहाय मत्स्यबीज निर्मिती केंद्रे

विभाग केंद्रे बंद केंद्रे

पुणे १५ ८

अमरावती १० ३

लातूर ७ २

छत्रपती संभाजीनगर ६ ४

नागपूर १७ ८

नाशिक ६ ६

मुंबई ६ ४

एकूण ६७ ३५

मत्स्योत्पादन व संवर्धन केंद्रे बंद असल्याने परराज्यांतून दुप्पट, तिप्पट पैसे देऊन बीज खरेदी करावी लागत आहे. केंद्रे सुरू झाल्यास दर्जेदार बीज मिळतील. चांदोली येथे मत्स्यबीज केंद्र पूर्ण झाले आहे. कटला, रोहू याला मागणी आहे. पण तिथे वेगळ्या जातीचे मासे मिळत आहेत.
- सुरेश गोसावी, अध्यक्ष, सांगली जिल्हा मच्छीमार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळदीच्या दरावरील दबाव कायम, गवारला उठाव कायम, शेवगा महागले; काकडी आवक वाढली, लसूणचे भाव स्थिर

Maharashtra Heavy Rain: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार

Water Storage : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ प्रकल्प पूर्ण भरले

Soybean MSP : सांगली जिल्ह्यात सोयाबीनला हमीभाव केवळ कागदावरच

Electricity Production : जळगावात होणार ६८२ मेगावॉट अतिरिक्त वीजनिर्मिती

SCROLL FOR NEXT