Sugarcane Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farmer News : शॉर्ट सर्किटने ३५ एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचे तब्बल ५० लाखांचे नुकसान

Sugarcane on Fire Due to Short Circuit : शिरोळ तालुक्यामध्ये हेरवाड येथे अब्दुललाट रस्त्यावरील पाटील मळीजवळ सुमारे ३५ एकरांहून अधिक क्षेत्रातील ऊस अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला.

sandeep Shirguppe

Kolhapur Farmer News : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये हेरवाड येथे अब्दुललाट रस्त्यावरील पाटील मळीजवळ सुमारे ३५ एकरांहून अधिक क्षेत्रातील ऊस अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला.

आगीमुळे जवळपास ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आगीचे खरे कारण समजू शकले नाही परंतु ही आग शॉर्टसर्किटने लागली असल्याचा अंदाज शेतकऱ्यांतून व्यक्त केला जात आहे.

सुमारे ५० एकरमध्ये जळालेला ऊस कारखाने सुरू होऊ पर्यंत शेतात राहणार असल्याने शेतकऱ्यानी चिंता व्यक्त केली. अशातच ऑक्टोबर हीट सुरू झाल्याने ऊस पीके वाळू लागली आहेत. जळालेल्या उसाला पाणी न दिल्यास ऊस वाळून जाण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी हेरवाड - अब्दुललाट रस्त्यावरील पाटील मळ्याशेजारी ऊस शेतीला काल (ता.०९) दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. बघता बघता आग पसरली व अंदाजे ३५ एकरांवरील क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी गेले.

दरम्यान, आग लागलेल्या शेतात जाण्यासाठी पायवाट रस्ता असल्याने अग्निशामक वाहन जाण्यासाठी अडचण निर्माण झाली त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

धुळगोंडा पाटील, विजय पाटील, दयानंद पाटील, सुनिल बरगाले, सुनिल माळी, सातगौड पाटील, रावसाहेब पाटील, प्रकाश माळी, सुरेश माळी, प्रकाश पाटील आदी शेतकऱ्यांचा , ऊस जळून खाक झाला. वीज वितरण कंपनीने जळीत ऊस क्षेत्राचे पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT