Loan Waive Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Incentive Subsidy : ‘प्रोत्साहन’चे ३३ हजार शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

Loan Waive Scheme : शेतकऱ्यांना ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी महा-आयटीमार्फत लघू संदेश देण्यात आला आहे.

Team Agrowon

Pune News : नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ३३ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान देण्याची प्रक्रिया सहकार आयुक्तालयाद्वारे सुरू करण्यात आली आहे.

यासाठी २०१९ मध्ये पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन सहकार आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे. तर, सर्व जिल्हा उपनिबंधकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सहकारी, खासगी आणि शासकीय बॅंकांना याबाबत माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत.

शेतकऱ्यांना ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी महा-आयटीमार्फत लघू संदेश देण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात संबंधित सहकारी, राष्ट्रीयीकृत बँकांनी देखील शेतकऱ्यांना व्यक्तिशः कळविण्यात येणार आहे.

लाभासाठी पात्र ठरलेले आणि त्याअनुषंगाने विशिष्ट क्रमांक देण्यात आलेले, परंतु आधार प्रमाणीकरण झाले नाही, अशा शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेची संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी केले आहे.

२०१९ मधील महात्मा फुले शेतकरी प्रोत्साहन योजनेअंतर्गत पात्र, परंतु तांत्रिक बाबींमुळे लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणच्या सूचना सर्व जिल्हा, सहकारी, शासकीय बॅंकांना केल्या आहेत. सात सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण झाल्यावर ५० हजार रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होणार आहे. ही संख्या सुमारे ३० हजार शेतकरी एवढी आहे.
- दीपक तावरे, सहकार आयुक्त

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT