Farmer Loan Waive Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waive Scheme : शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३२ हजार खातेदार अपात्र

Loan Waive Scheme : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर योजनेसाठी अर्ज केलेले ३२ हजार ४८८ शेतकरी अपात्र ठरले आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर योजनेसाठी अर्ज केलेले ३२ हजार ४८८ शेतकरी अपात्र ठरले आहेत. याची यादी प्रसिद्ध केली आहे.

पात्र १० हजार २३६ शेतकऱ्यांना अद्यापही प्रोत्साहनात्मक रक्कम मिळालेली नाही. त्यांना निधी मिळताच ही रक्कम दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे, जिल्ह्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या ३ लाख ९४४ कर्जखात्याची माहिती पोर्टलवर भरण्यात आली. त्यापैकी अपलोड केलेल्या कर्जखात्यांपैकी १ लाख ८९ हजार ३५८ इतक्या कर्जखातेदारांना पोर्टलवरून विशिष्ट ओळख क्रमांक मिळाला. त्यापैकी १ लाख ८७ हजार ६२२ कर्ज खातेधारकांनी आधार प्रमाणिकरण झाले.

प्रमाणीकरण केलेल्या कर्जखातेधारकापैकी १ लाख ७७ हजार ३५९ कर्जखातेधारकांना ६४४ कोटी ६९ लाख रुपये प्रोत्साहनपर सानुग्रह अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ दिला. उर्वरित १० हजार २६३ कर्जखाते धारकांचे आधार प्रमाणिकरण करुनही प्रोत्साहनपर सानुग्रह अनुदान मिळाले नाही.

त्यांना निधी आल्यानंतर ही रक्कम दिली जाणार आहे. जे शेतकरी कर भरतात, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी आहेत. शेती व्यतिरिक्त इतर व्यवसाय करतात, निवृत्तिवेतन सुरू आहे, अनुदानित संस्थेचे कामगार आहेत, सहकारी बँकांमध्ये कर्मचारी असून ज्यांचे उत्पन्न २५ हजारपेक्षा जास्त आहे अशा लोकांना या योजनेतून अपात्र केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

IFFCO Nano NPK Fertilisers: 'इफको'च्या लिक्विड, दाणेदार नॅनो एनपीके खतांना केंद्राची मंजुरी, पीक उत्पादन वाढीसाठी महत्त्वाची

Water Storage: खानदेशात जलसाठा ६२ टक्क्यांवर

Shade Net House: शेडनेट हाउस उभारणीसाठी लागणारे कव्हरिंग साहित्य

Farmer Crisis: एकोणीस मार्चला का करायचा उपवास?

PMGSY Road Issue: सहा महिन्यांत ४६ कोटींचा रस्ता उखडला

SCROLL FOR NEXT