Agriculture Mechanization Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Mechanization : ‘कृषी यांत्रिकीकरण’मधून ३२ कोटी रुपये वितरित

Agriculture Mechanization Subsidy : सातारा जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये कृषी अवजारांसाठी ६ हजार २२९ शेतकऱ्यांना सुमारे ३२ कोटी ६३ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

Team Agrowon

Satara News : ‘‘ सातारा जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये कृषी अवजारांसाठी ६ हजार २२९ शेतकऱ्यांना सुमारे ३२ कोटी ६३ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे,’’ अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.

फरांदे म्हणाले, ‘‘ट्रॅक्टर- ५९० लाभार्थ्यांना ७ कोटी २६ लाख, पॉवर टिलर- २९९ लाभार्थ्यांना २ कोटी ५० लाख, इतर कृषी अवजारे (रोटावेटर, पेरणी यंत्र, पल्टी नांगर, मळणी यंत्र, चाफ कटर)- ५ हजार ३१६ लाभार्थ्यांना २१ कोटी ७७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.’’

भाडेतत्त्वावर कृषी यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषी अवजारे बँक स्थापना या घटकांसाठी २४ लाभार्थ्यांना १ कोटी १० लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

या वर्षी कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी जिल्ह्यात ४३ कोटी रुपयांचा कार्यक्रम प्रस्तावित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध कृषी अवजारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

‘‘या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर - १.२५ लाख, पॉवर टिलर ८५ हजार, स्वयंचलित भात लावणी यंत्र ८ लाख, रिपर कम बाइंडर २.५ लाख, पल्टी नांगर ८९ हजार ५००, रोटाव्हेटर ५० हजार, पॉवर वीडर ७५ हजार, मिनी राइस मिल २.४० लाख, मिनी डाळ मिल १.५० लाख, मिलेट मिल ५.४० लाख, कल्टिव्हेटर ५० हजार, चाफकटर ६ हजार ३०० रुपयांपर्यंतचा मर्यादेत लाभ दिला जातो.

शेतकऱ्यांनी मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा’’, असे आवाहन फरांदे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT