Agricultural Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : देगाव कालव्यासाठी ३०० कोटींची तरतूद करणार

Devendra Fadnavis : राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग होणार आहे आणि त्यात अक्कलकोट आणि सोलापूर असणार आहे.

Team Agrowon

Solapur News : अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरच्या शेतीसाठी महत्त्वाचा असणारा देगाव एक्स्प्रेस कालवा या योजनेसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करू, तसेच अमृत-२ या योजनेतून अक्कलकोटच्या पाणीपुरवठ्यासाठी ७५ कोटी रुपयांची घोषणा करताना, अक्कलकोटला नियमित पाणी मिळेल, यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. १९) येथे दिले.

अक्कलकोटमधील फत्तेसिंह चौकात उपमुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीरसभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवानंद पाटील, सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग होणार आहे आणि त्यात अक्कलकोट आणि सोलापूर असणार आहे.

त्याशिवाय राज्य शासनाकडून अक्कलकोट येथील मल्लिकार्जुन मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी दोन कोटींचा निधी, तर नवीन बस स्थानकाच्या विकासासाठी २९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. या वेळी आमदार कल्याणशेट्टी यांनी प्रास्ताविकात अक्कलकोटसाठी भरीव तरतुदी जाहीर केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

मल्लिकार्जुन मंदिरासह बस स्थानकालाही निधी

अक्कलकोट शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री मल्लिकार्जुन मंदिरासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याशिवाय अक्कलकोटच्या नूतन बस स्थानकासाठी २९ कोटी रुपये निधी मंजूर असून, स्वामी समर्थ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत, असेही या वेळी सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT