Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : खानदेशातील रब्बी पेरणी ३० टक्के पूर्ण

Rabi Season : खानदेशात रब्बीची पेरणी रखडत सुरू आहे. पेरणी सुमारे ३० टक्के पूर्ण झाली असून, हरभऱ्याची सर्वाधिक सुमारे ४० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रब्बीची पेरणी रखडत सुरू आहे. पेरणी सुमारे ३० टक्के पूर्ण झाली असून, हरभऱ्याची सर्वाधिक सुमारे ४० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. खानदेशात यंदा सुमारे पावणेतीन लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. यातील कोरडवाहू दादर ज्वारी व कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी बऱ्यापैकी झाली आहे.

ही पेरणी मागील महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात वेगात सुरू होती. ती या महिन्याच्या सुरवातीलाच पूर्ण झाली आहे. कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी तापी, अनेर, गिरणा नदीच्या क्षेत्रात अधिक झाली आहे. ही पेरणी जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा भागात अधिक झाली आहे.

यंदा पेरणी सुरुवातीपासून रखडत सुरू आहे. कारण सोयाबीन पिकाची मळणी केल्यानंतर त्यात हरभऱ्याची पेरणी करण्याचे नियोजन अनेकांनी केले होते. सोयाबीनची कापणी, मळणी व पुढे शेताची पूर्वमशागत यासाठी वेळ लागला. परिणामी पेरणीला विलंब झाला. यामुळे पेरणी रखडत सुरू होती. सध्या गहू पेरणी सुरू आहे.

तसेच हरभऱ्याची पेरणीदेखील कृत्रीम जलसाठाधारक करीत आहेत. अनेक शेतकरी कापूस पीक काढून पेरणीचे नियोजन करीत आहेत. यामुळे पेरणी पुढेही सुरू राहणार आहे. पूर्वहंगामी कापूस पीक काढून त्यात पुढे हरभरा, मक्याची पेरणी, लागवड होईल. यामुळे या पेरणीसंबंधी कापूस पीक काढण्याचे काम सुरू आहे. अनेकांचे कापूस पीक आणखी एक वेचणीनंतर काढले जाईल. यामुळे पेरणीला विलंब होणार आहे किंवा पेरणी डिसेंबरमध्येही होईल.

यंदा पाऊसमान कमी आहे. यामुळे पेरणी कमी किंवा अपेक्षेपेक्षा कमी होणार आहे. कोरडवाहू पिकांची पेरणी फक्त काळ्या कसदार जमिनीत झाली आहे. मुरमाड, हलक्या जमिनीच्या क्षेत्रात ही पेरणी कमी झाली आहे.

यामुळे यंदा रब्बीचे क्षेत्र मागील हंगामाच्या तुलनेत घटणार आहे. त्यात मक्याची व गव्हाची पेरणी यंदा कमी होईल. कारण या पिकांना पाणी व खर्चही अधिक लागतो. या पिकांएेवजी यंदा अनेकांनी ज्वारीची पेरणी केली आहे.

मक्याची लागवड अल्प

मक्याची लागवड खानदेशात रब्बी हंगामात अल्प किंवा फक्त सात हजार हेक्टरवर झाल्याची माहिती आहे. ही लागवड जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात अधिक आहे. जळगाव, चोपडा, यावल, जामनेर, पाचोरा भागात मका लागवड अद्याप अपवादानेच सुरू आहे. पुढे ही लागवड वाढेल, असेही जाणकारांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

Wetland Ecosystems: पाणथळ सृष्टी व्यवस्थेचे विश्व

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

Spider Mite Issue: वांग्यावरील लाल कोळीची समस्या

Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती

SCROLL FOR NEXT