Milk Union Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate Hike in Jalgaon : जळगाव दूध संघाकडून बल्क कूलिंगच्या दूधदरात ३० टक्के वाढ

जळगाव जिल्हा दूध संघाने बल्क कूलिंग सेंटरच्या दुध दरात प्रतिलिटर ३० टक्क्यांनी वाढ केली आहे..

Team Agrowon

Jalgaon Milk Sangh : जळगाव जिल्हा दूध संघाने बल्क कूलिंग सेंटरच्या दुध दरात प्रतिलिटर ३० टक्क्यांनी वाढ केली आहे. संचालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक झाली. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) अध्यक्षस्थानी होते. बैठकीच्या अजेंड्यावरील ३७ विषय मंजूर करण्यात आले.

जिल्हा दूध संघातर्फे बल्क कूलिंग सेंटरच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी कूलिंग सेंटरला ३० पैसे प्रतिलीटरप्रमाणे दर दिला जात होता.

तो आता ४३ पैसे प्रतिलीटरप्रमाणे देण्यात येणार आहे. जिल्ह्यात तब्बल २२ बल्क कूलिंग सेंटर आहेत. पाच वर्षांपासून दरवाढीची मागणी होत होती. प्रथमच ती मंजूर करण्यात आली आहे.

संजय पवार, मधुकर राणे, रोहित निकम, रावसाहेब भोसले, ठकसेन पाटील, नितीन चौधरी, प्रमोद पाटील, दिलीप वाघ, पराग मोरे, श्‍यामलताई झांबरे, पूनम पाटील, छाया देवकर, रमेश पाटील, शैलेश मोरखडे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT