Agriculture pump Agrowon
ॲग्रो विशेष

Mahavitran Bill Subsidy : शेतकऱ्यांना कृषीपंप वीजबिलवर ३० टक्के सवलत; ३१ मार्चपर्यंत मुदत

शेतकऱ्यांनी कृषीपंपाची थकबाकी भरावी, यासाठी महावितरणच्या वतीने कृषी वीज धोरण राबवले आहे. या योजनेनुसार पहिल्या वर्षी कृषीपंपाची वीजबिल थकबाकी भरल्यास ५० टक्के सूट देण्यात येणार आहे.

Team Agrowon

Electricity Bill : ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कृषी पंपाची (Agriculture pump) ७० टक्के थकबाकी भरल्यास ३० टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. राज्यात मार्च महिन्याच्या अखेरीस महावितरणकडून थकबाकी वसूलीसाठी प्रयत्न केले जातात. त्यासाठी वीज ग्राहकांना विविध सवलती देण्यात येतात.

त्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यात कृषीपंप थकबाकीदार शेतकऱ्यांना महावितरणकडून ३० टक्के रक्कम माफ करण्याची योजना राबवली जात आहे.

राज्यात कृषी वीज धोरण २०२० अंतर्गत वीजबिल थकबाकीदारांना सूट देण्यात येते. जास्तीत जास्त कृषीपंप धारकांनी वीज बिल भरावे, यासाठी आकर्षक सवलत या योजनेमध्ये देण्यात येते.

या कृषी धोरणात समावेश असणाऱ्या शेतकऱ्यांच्या थकबाकीवर महावितण व्याज आणि विलंब रक्कमेवर सूट देते. यंदा या योजनेचे दुसरे वर्ष आहे.

या योजनेअंतर्गत सुधारित थकबाकीत ३० टक्के सूट देण्यात आली आहे. तर १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या काळात थकबाकीवर २० टक्के सूट मिळणार आहे.

योजना काय आहे?

शेतकऱ्यांनी कृषीपंपाची थकबाकी भरावी, यासाठी महावितरणच्या वतीने कृषी वीज धोरण राबवले आहे. या योजनेनुसार पहिल्या वर्षी कृषीपंपाची वीजबिल थकबाकी भरल्यास ५० टक्के सूट देण्यात येणार आहे.

तर दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी थकबाकी भरल्यास अनुक्रमे ३० आणि २० टक्के सूट महावितरण देणार आहे. चालू वर्ष योजनेचे दुसरे वर्ष आहे.

तसेच नियमित वीज बिल भरणाऱ्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांना योजनेच्या कालावधीत बिलावर ५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. महावितरणवर थकबाकीचा बोजा असल्याने तो कमी करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत.

वसूलीसाठी सक्ती?

उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज बिल वसूलीसाठी सक्तीचे आदेश दिले नाहीत, असे अर्थसंकल्प अधिवेशनात सांगितले होते.

परंतु दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांकडून सक्तीने वीजबिल वसूली केली जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यात चालू बिल भरावेच लागेल, अशी भूमिका महावितरणने घेतली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र वीज नियामक आयोग वीज दरनिश्चितीसंदर्भात ३१ मार्चला आदेश जारी करणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या १ तारखेपासून वीज जवळपास अडीच रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

Orange Orchards Crisis: पाण्याअभावी संत्रा बागा संकटात; वाशीममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mango Variety Research: नवसारी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी

Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन

SCROLL FOR NEXT