Chana Procurement  Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Procurement : शासकीय हरभरा खरेदीची ३० केंद्रे शक्य

Chana Market : खानदेशात शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त यंदा लवकर होईल, असे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे. यंदा खरेदी मे महिन्यात सुरू होईल, असे संकेत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त यंदा लवकर होईल, असे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे. यंदा खरेदी मे महिन्यात सुरू होईल, असे संकेत आहेत. मागील वर्षी हरभरा खरेदी जूनमध्ये सुरू झाली होती.

हरभरा, बाजरी, मका आदींची खरेदी एकाच वेळी खानदेशात सुरू होईल, असे संकेत आहेत. परंतु अद्याप या खरेदीसाठी नोंदणी किंवा अन्य कार्यवाही सुरू झालेली नाही. ही कार्यवाही लवकर सुरू करण्याचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे. खरेदी खानदेशात २२ केंद्रांत होईल, अशीही माहिती आहे.

जळगावात जिल्ह्यात पुढील महिन्यात हरभरा मळणी सुरू होईल. मळणीनंतर आवक वाढते व दर कमी होता. यामुळे हमीभावात हरभरा विक्री करण्यासाठी शेतकरी नियोजन करीत असून, त्यासंबंधी लवकर खरेदी सुरू करण्याची मागणी होत आहे. पण जळगाव जिल्ह्यात सुमारे १८ व धुळे नंदुरबारात मिळून १२ केंद्रांत हरभरा खरेदी होईल, असाही अंदाज आहे.

जळगाव जिल्ह्यात हरभरा विक्रीसाठी मोठा प्रतिसाद मिळतो. धुळ्यातही चांगला प्रतिसाद हरभरा खरेदीस मिळतो. पण सध्या हरभरा विक्रीसाठी नोंदणी सुरू झालेली नाही. बाजारात हरभऱ्याचे दर मागील वेळेस काही दिवस हमीभावाच्या जवळपास होते. परंतु सध्या दरांबाबत कुठलाही अंदाज नाही.

हरभरा पेरणी खानदेशात कमी झाली आहे. परंतु आवक एकाच वेळी सुरू होईल व दर कमी होतील, अशी स्थिती आहे. मागील वेळेस देशी प्रकारच्या हरभऱ्याला ४५०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटल, एवढे होते. यंदाही अशीच स्थिती राहू शकते. यामुळे शासकीय केंद्रात हरभरा विक्रीसंबंधी नोंदणीची प्रक्रिया सुरू होईल, अशी प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. शासकीय दर कमी आहेत. कारण उत्पादन खर्च वाढत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT