Bail Jodi agrowon
ॲग्रो विशेष

Animal Market Kolhapur : कोल्हापूरच्या जनावर बाजारात ३ कोटींची उलाढाल; खिलार बैलजोड ९ लाखांना विक्री

kolhapur : कोल्हापूर येथील वडगाव बाजार समितीत विजयादशमीच्या पहिल्या सोमवारी जनावरांचा अंबाबाई लक्ष्मी बाजार महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात प्रसिद्ध आहे.

sandeep Shirguppe

Vadgaon Bajar Samiti Kolhapur : कोल्हापूर येथील वडगाव बाजार समितीत विजयादशमीच्या पहिल्या सोमवारी जनावरांचा अंबाबाई लक्ष्मी बाजार महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात प्रसिद्ध आहे. सोमवारी (ता.०७) याबाजारात तब्बल तीन कोटींची उलाढाल झाली.

महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने बाजारात खरेदीसाठी आले होते. या बाजारात नायकू महादेव भोसले (रा. बावची) यांची नऊ लाख किमतीची खिलार जातीची बैलजोडीने शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

कोल्हापूर जिल्ह्यातील वडगावचा बाजार महाराष्ट्र, कर्नाटक आदींसह शेजारील राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. उत्तम जातीची बैल जोडी, म्हशी यांची खरेदी-विक्री येथे मोठ्या प्रमाणात होते. म्हशींच्या बाजारात मुरा, म्हैसाणा, पंढरपुरी, दुग्गल, गावठी, जाफराबादी, दुग्धी, मेंढा अशा विविध जातींच्या म्हशी विक्रीसाठी आल्या होत्या. म्हशीच्या किमती चाळीस हजार ते दोन लाखांपर्यंत होत्या.

गायीच्या जातीमध्ये एच एफ, होस्टन, जर्सी, रेड डेनिथ, गीर विक्रीस आल्या होत्या. त्यांच्या किमती ४० हजारांपासून दोन लाखांपर्यंत होत्या. गायीची आवक मोठी होती. खरेदी-विक्रीचे व्यवहार सर्वाधिक गाय, म्हशींचे झाले.

बैलांच्या जातीमध्ये खिलार, माणदेशी, म्हैसुरी, जवारी, दुग्गल, दुदांती अशा जातींचा समावेश होता. पन्नास हजारांपासून ते चार लाखांपर्यंत बैलांची विक्री झाली. मोहन चव्हाण (बुवाचे वठार) यांची खिलार जातीची बैलजोडी चार लाखांपर्यंत होती. शिवाजी लाड (येळापूर) याचा मुरा जातीचा वळू विक्रीसाठी आला होता. त्याची किंमत अडीच लाख होती.

घरच्या सदस्याप्रमाणे जनावरांची निगा

या बाजारात दरवर्षी नायकू भोसले यांची बैलजोडी खास आकर्षण असते. त्यांना उत्तम जातीची बैलजोडी पाळण्याचा छंद आहे. त्यांच्या बैलजोडीला महिन्याचा खर्च पंधरा हजारांपेक्षा अधिक आहे. कुटुंबातील एक सदस्याप्रमाणे जनावरांची निगा व पालन केले जाते. गेल्या वर्षीची त्यांची बैलजोडी ऋतिक काटे, पुणे यांनी आठ लाखांस खरेदी केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Financial Crisis: दुष्काळात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

Onion Storage Loss: साठवणुकीत ३७ टक्के कांद्याचे नुकसान

MLA Pension Rule: आमदारांच्या निवृत्ती वेतनाला आव्हान; उच्च न्यायालयाची प्रकरणावर सुनावणीस मान्यता

Urea Subsidy Formula: युरिया अनुदानाचे सूत्र बदलण्याची शिफारस

October Heat: ‘ऑक्टोबर हीट’ ठरतेय तापदायक

SCROLL FOR NEXT