Kolhapur Sugar Factories agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Sugar Factories : २८ महिन्यांचा पगार थकवला, कामगारांचा पीएफ भरला नाही, गडहिंग्लज कारखान्याची अवस्था बिकट

Gadhinglaj sugar : गडहिंग्लज तालुक्यातील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे पगार थकवल्याने कामगारांची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Gadhinglaj Sugar : गडहिंग्लज तालुक्यातील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे पगार थकवल्याने कामगारांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत पगार मिळण्यासह कामगारांचा प्रॉव्हिडंड फंड भरावा, या मागणीसाठी अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या (गोडसाखर) कामगारांनी गेट बंद आंदोलन केले. कारखान्याने उत्पादित केलेली साखर आणि कंपोस्ट विक्रीसाठी बाहेर सोडू नये, असे पत्र साखर कामगार संघाने सुरक्षारक्षकाला दिले.

गडहिंग्लज साखर कारखान्याच्या कामगारांचे तीन टप्प्यांतील एकूण १६ कोटी २२ लाखांचा प्रॉव्हिडंड फंड अद्याप कारखान्याने भरलेला नाही. शिवाय २८ महिन्यांचा पगार थकलेला आहे. प्रॉव्हिडंड फंड वेळेत न भरल्याने निवृत्त कामगारांना पेन्शन क्लेम करता आलेला नाही. यामुळे निवृत्तांना घरी जाताना ग्रॅच्युईटीची रक्कमही मिळालेली नाही.

तसेच कार्यरत कामगारांना त्यांच्या प्रापंचिक कारणासाठी फंडाची रक्कम खात्यातून काढता येत नाही. वेळोवेळी संचालक मंडळाशी पत्रव्यवहार करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ही रक्कम तातडीने भरण्यासाठी कारखान्याला आदेश व्हावेत, या मागणीचे निवेदन कामगार संघाने विभागीय आयुक्तांना दिले आहे.

दरम्यान, कारखान्याकडे १ लाख ७० हजार क्विंटल साखर शिल्लक आहे. कंपोस्टचा साठाही आहे. या उत्पादित मालाच्या विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतून कामगारांची देणी देण्यास कोणतीही अडचण येणार नाही. साखरसाठा विक्रीची रक्कम इतरत्र कुठेही न वापरता कामगारांची देणी द्यावीत, या मागणीसाठी आज कामगार संघाने गेट बंद आंदोलन केले.

साखर व कंपोस्ट बाहेर सोडू नये, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात सुरक्षारक्षकांना निवेदन देऊन गेटबंद केले. अध्यक्ष विजय रेडेकर, उपाध्यक्ष श्रीकांत नार्वेकर, सचिव अरुण शेरेगार, सुरेश कबुरी आदीसह सव्वाशेहून अधिक कामगार उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Agriculture Admission 2026: कृषी शिक्षण प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात

Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन

Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

SCROLL FOR NEXT